शुक्रवारपासून आनंदीस्वामी महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 01:31 AM2019-07-02T01:31:17+5:302019-07-02T01:31:29+5:30
प्रसिध्द आनंदीस्वामी यात्रा उत्साहास शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील प्रसिध्द आनंदीस्वामी यात्रा उत्साहास शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त मंदिरात भजन, कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १२ जुलै रोजी आनंदीस्वामी महाराजांची आषाढी एकादशीनिमीत्त पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
५ जुलै पासून सप्ताहास प्रारंभ होत आहे. दुपारी आनंदीस्वामी मंदीरात महिला भजनी मंडळांचे कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी ह.भ.प कृष्णा महाराज खोत यांचे किर्तन होणार असून ६ जुलै रोजी ह.भ.प सविताबाई मुळे, ७ जुलै ह.भ.प प्रकाश महाराज गोंदीकर, ९ जुलै ह.भ.प पंकज महाराज थोरे, ९ जुलै ह.भ.प पांडुरंग महाराज उगले, १० जुलै ह.भ.प संतोष महाराज आढावणे, ११ जुलै रोजी ह.भ.प विजय महाराज गवळी यांचे कीर्तन होणार आहे. कीर्तनाची दररोजची वेळ ही सायंकाळी ६ ते ९ ठेवण्यात आली आहे. ११ जुलै रोजीच रात्री सुरेश महाराज मोहिदे यांचे चक्रीभजन होणार आहे.
१२ जुलै रोजी आषाढी एकादशिनिमीत्त आनंदीस्वामी महाराजांची सकाळी ७ वाजता पालखी मिरवणूक निघणार आहे. दरम्यान १४ जुलै रोजी ह.भ.प नानामहाराज पोखरीकर यांचे कीर्तन होणार आहे.