खोदकामात सापडली महादेवाची पिंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:39 AM2018-11-26T00:39:25+5:302018-11-26T00:40:18+5:30

अंबड तालुक्यातील महाकाळा येथे श्रीराम मंदिराची उभारणी सर्व गावकऱ्यांच्या पुढाकाराने हाती घेण्यात आली आहे. रविवारी मंदिराचा पाया खोदत असताना आठ फूटावर दोन महादेवाच्या मूर्ती आणि एक कुंड सापडले.

Ancient statue of god found | खोदकामात सापडली महादेवाची पिंड

खोदकामात सापडली महादेवाची पिंड

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अंकुशनगर : अंबड तालुक्यातील महाकाळा येथे श्रीराम मंदिराची उभारणी सर्व गावकऱ्यांच्या पुढाकाराने हाती घेण्यात आली आहे. रविवारी मंदिराचा पाया खोदत असताना आठ फूटावर दोन महादेवाच्या मूर्ती आणि एक कुंड सापडले. ही माहिती परिसरात पसरताच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
महाकाळा, अंकुशनगर ही प्राचीन काळापासून ऋषी-मुनींची वसती म्हणून परिचित आहे. तसेच येथे प्राचीन महाकाली देवीचे मंदिरही आहे. अंकुशनगरच्या पश्चिमेस लोकसहभागातून भव्य राम मंदिर उभारणीचे काम हाती घेण्यात आले असून, रविवारी जेसीबीच्या मदतीने पाया खोदण्याचे काम सुरू असताना आठ फुटांवर पाया खोदून झाल्यावर तेथे दोन महादेवाच्या पिंडी सापडल्या. तसेच एक यज्ञकुंडही आढळून आले. या भागात अनेक तपस्वी लोकांच्या समाधी असल्याचे जुने-जाणकार सांगतात. यामुळे या भागाचे खºया अर्थाने उत्खनन झाल्यास येथे आणखी ऐतिहासिक ठेवा सापडू शकतो, असे जुने जाणकार सांगतात.

Web Title: Ancient statue of god found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.