अन् जालना झाला ‘रेशीम’ जिल्हा, राज्यातील एकमेव जिल्हा : ९८७ एकरांवर तुतीची लागवड

By विजय मुंडे  | Published: September 7, 2024 12:17 PM2024-09-07T12:17:22+5:302024-09-07T12:17:33+5:30

Jalana News: जालना जिल्ह्यातील ९६९ शेतकरी ९८७ एकरांवर तुतीची लागवड करून रेशीम कोष उत्पादन घेत आहेत. जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ऑटोमॅटिक रिलिंग मशीनची उभारणी केल्यामुळे रेशीम धागा निर्मिती होत आहे. त्यामुळे आता रेशीम अंडीपुंज, कोष उत्पादन ते रेशीम धागा निर्मिती करणारा जालना जिल्हा राज्यात एकमेव ठरला आहे. 

And Jalna Jala 'Resheem' district, the only district in the state: Mulberry cultivation on 987 acres | अन् जालना झाला ‘रेशीम’ जिल्हा, राज्यातील एकमेव जिल्हा : ९८७ एकरांवर तुतीची लागवड

अन् जालना झाला ‘रेशीम’ जिल्हा, राज्यातील एकमेव जिल्हा : ९८७ एकरांवर तुतीची लागवड

- विजय मुंडे
जालना - जिल्ह्यातील ९६९ शेतकरी ९८७ एकरांवर तुतीची लागवड करून रेशीम कोष उत्पादन घेत आहेत. जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ऑटोमॅटिक रिलिंग मशीनची उभारणी केल्यामुळे रेशीम धागा निर्मिती होत आहे. त्यामुळे आता रेशीम अंडीपुंज, कोष उत्पादन ते रेशीम धागा निर्मिती करणारा जालना जिल्हा राज्यात एकमेव ठरला आहे. 
रेशीम शेतीसाठी शासनाकडून प्रति एकर तीन लाख ९७ हजार ३३५ रुपये अनुदानासह अंडीपुंजही दिले जातात. २०२३-२४ मध्ये रेशीम कोषाला प्रति क्विंटल ४३ हजार रुपयांचा भाव मिळाला. एक एकरात तुतीची लागवड करून ३५० अंडीपुंजाची दोन पिके घेता येतात. पहिल्या वर्षी एक लाख १२ हजारांचे उत्पन्न मिळते. दुसऱ्या वर्षी ८०० अंडीपुंजाचे संगोपन करून ४५० रुपये प्रतिकिलोप्रमाणे दोन लाख ५२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. 

आता रेशीम कापडही निर्मिती केली जाईल
रेशीम धागा निर्मितीच्या पुढील प्रक्रिया उद्योग ज्यात रेशीम धाग्यास पीळ देणे, रेशीम धाग्यांची रंगणी करणे,  रंगणी केलेल्या रेशीम धाग्यापासून रेशीम कपडानिर्मिती करणे आदीसाठी जिल्हाधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहेत.

रेशीम कोष बाजारपेठ
रेशीम कोष विक्रीसाठी शेतकऱ्यांना कर्नाटकात जावे लागत होते. परंतु, २०१८पासून जालन्यात रेशीम कोष बाजारपेठ सुरू झाली. शेतकऱ्यांना जालन्यातील बाजारपेठेतच कर्नाटकचा दर मिळत आहे.

Web Title: And Jalna Jala 'Resheem' district, the only district in the state: Mulberry cultivation on 987 acres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.