अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे तीन दिवस आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 12:40 AM2019-02-12T00:40:55+5:302019-02-12T00:41:19+5:30
अंगणवाडी कर्मचा-यांनी एकजुटीने राज्य व केंद्र सरकारने अथर्संकल्पीय अधिवेशनामध्ये पुरेसा निधी उपलब्ध करुन न दिल्याने आयकट प्रणित सर्व कामगार संघटनांनी राज्यात तीन दिवस आंदोलनाची हाक दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अंगणवाडी कर्मचा-यांनी एकजुटीने राज्य व केंद्र सरकारने अथर्संकल्पीय अधिवेशनामध्ये पुरेसा निधी उपलब्ध करुन न दिल्याने आयकट प्रणित सर्व कामगार संघटनांनी राज्यात तीन दिवस आंदोलनाची हाक दिली आहे. आॅल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्यावतीने सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
सरकार अंगणवाडी कर्मचा-यांना दुय्यम वागणूक देत आहे. राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाची अद्यापही पुरतता केली नसल्याने अंगणवाडी कर्मचारी संताप व्यक्त करीत आहे. तसेच केंद्र सरकारने अर्थं संकल्पीय अधिवेशनातही निधी देण्यात आला नाही. यासाठी राज्यभरात ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान, आंदोलन करण्यात येणार असून, त्याअनुषांने सोमवारी आॅल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्यावतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांना देण्यात आले. याप्रसंगी कॉ. देविदास जिगे, कॉ. आशा कुलकर्णी, कॉ. बाबासाहेब जिगे, गजानन तळेकर, बाबूराव तांबडे, अनिता वनारसे, अनिता कड, छाया जाधव, वैशाली राजपूत, वंदना सारखे, रिना साळवे, सरला निकाळजे, मिना सोनपते, सुनील पारखे, गजराबाई विश्वनाथ, उषा बोर्डे, चंद्रकला सोनुने, जोगदंड आदी कर्मचा-यांची उपस्थिती होती.