संतप्त नागरिकांचा हंडामोर्चा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:46 AM2019-05-28T00:46:54+5:302019-05-28T00:47:04+5:30
पुणेगाव येथे टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी महिला, नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंडा आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दिवसेंदिवस पाणीटंचाईची समस्या वाढत चालली आहे. गावात पाणी मिळत नसल्यामुळे नागरिक, महिलांतून रोष व्यक्त होत आहे. पुणेगाव येथे टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी महिला, नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंडा आंदोलन केले.
जालना तालुक्यातील पुणेगाव येथे सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दोन दिवसांपूर्वीच ग्रामस्थांनी जि.प. कार्यालयासमोर हंडा आंदोलन केले होते. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एक टँकर मजूर केले. एक दिवस गावात टँकरही आले. परंतु, त्यानंतर गावात टँकर आलेच नाही.
एका टँकरवर तहान भागविणे अवघड झाले आहे. पाणी टंचाईच्या या समस्येकडे सरपंच, ग्रामसेवकाकडून दुर्लक्ष होत आहे. यामुळे गावात दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंडा आंदोलन केले. यावेळी कारभारी साहेबराव अंभोरे, शांता दारकड, लता करपे, सतीश इंगळे, नारायण घुगे, धोंडीराम चुनखडे, धोंडीराम चुनखडे, सोपान उगले, राजाभाऊ चुनखडे आदींची उपस्थिती होती.
पाण्यासाठी रास्ता रोकोचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री / जामखेड : अंबड तालुक्यातील बारासवाडा येथील गल्हाटी धरणात जायकवाडी धरणातील डाव्या कालव्यातून पाणी सोडविण्यात यावे, अशी मागणी वीस गावातील शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन सोमवारी अंबड तहसीलदारांना देण्यात आले. मागणी मान्य न केल्यास ‘रास्ता रोको’ करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
यंदाच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी गल्हाटी धरण संघर्ष समिती व परिसरातील शेतकरी अनेक वर्षांपासून गल्हाटी धरणात जायकवाडी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी करत आहे. याबाबत ०२ मार्च २०१९ रोजी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शहापूर येथे रास्ता रोको करण्यात आला होता. मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही शेतक-यांनी घेतला होता. परंतु, अंबड तहसीलदारांच्या मध्यस्तीने हा निर्णय मागे घेण्यात आला होता. मात्र, अद्यापही याची दखल प्रशासनाने घेतली नाही.
गल्हाटी धरणात पाणी नसल्यामुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गल्हाटी धरणात प्रशासनाने तात्काळ पाणी सोडावे, अशी मागणी शेतकºयांच्यावतीने करण्यात आली. येत्या चार दिवसात पाणी सोडले नाही तर ३१ मे रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी संतोष जेधे, पांडुरंग गटकळ, बंडू मैद, ए. एस. जाधव, संतोष झनझने, प्रवीण पवार, अनिल राठोड, अनिल सावंत, रमेश सोनवणे, उमेश गव्हाणे आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती.