संतप्त नातेवाईकांचा जिल्हा रुग्णालयात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:21 AM2021-07-01T04:21:42+5:302021-07-01T04:21:42+5:30

एकूणच या मृत्यूनंतर मृतदेह मिळावा म्हणूनदेखील चार ते पाच तास लागले. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केले. विशेष म्हणजे ...

Angry relatives stay at the district hospital | संतप्त नातेवाईकांचा जिल्हा रुग्णालयात ठिय्या

संतप्त नातेवाईकांचा जिल्हा रुग्णालयात ठिय्या

googlenewsNext

एकूणच या मृत्यूनंतर मृतदेह मिळावा म्हणूनदेखील चार ते पाच तास लागले. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केले. विशेष म्हणजे सदरील महिलेचा मृत्यू हा कोरोनाने झाला नसल्याचे अँटिजन चाचणीतून स्पष्ट झाले होते.

संतप्त नातेवाईकांना शांत करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शेख अक्तर यांनी यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. संबंधित महिलेचा मृतदेह लवकरात लवकर द्यावा, अशी विनंती त्यांनी डॉ. कांता इंगळे यांच्याकडे केली; परंतु त्यावेळी इंगळे यांनी नकार दिल्याने शेख अख्तर आणि डॉ. इंगळे यांच्यातही शाब्दिक चकमक झाली. या डॉक्टरावर कारवाई करण्याची मागणीदेखील संतप्त नातेवाईकांनी केली आहे.

प्रकरणाची चौकशी करणार

सदरील महिलेचा मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झालेला नाही; परंतु संतप्त नातेवाईकांचा आरोप असल्याने तो आम्ही गंभीरतेने घेतला आहे. या सर्व प्रकरणांच्या खोलात जाऊन आम्ही चौकशी करू तसेच दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

- डॉ. प्रताप घोडके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: Angry relatives stay at the district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.