राजाटाकळी येथे जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:23 AM2021-06-02T04:23:03+5:302021-06-02T04:23:03+5:30
कारवाईची मागणी घनसावंगी : शहरासह ग्रामीण भागात अवैध गुटखा विक्री जोमात सुरू आहे. राज्य शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातलेली ...
कारवाईची मागणी
घनसावंगी : शहरासह ग्रामीण भागात अवैध गुटखा विक्री जोमात सुरू आहे. राज्य शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातलेली असतानाही सर्रासपणे गुटख्याची अवैध विक्री केली जात आहे. ही बाब पाहता संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कारवाई मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
बदनापूर येथे एक दिवसीय प्रशिक्षण
बदनापूर : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीअंतर्गत असलेल्या कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर व आत्मा कृषी विभाग, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जलशक्ती अभियानांतर्गत एकदिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी कार्यक्रम समन्वयक डॉ. सचिन सोमवंशी यांनी मार्गदर्शन केले. डॉ. दीपाली काबंळे यांनी पाणी आडवा पाणी जिरवा याबाबत माहिती दिली.
पुरातन वेशीवरील झाड कोसळले
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथील पोलीस ठाण्यासमोर असलेल्या पुरातन वेशीवरील झाड शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे कोसळले. रहदारीच्या असलेल्या या रस्त्यावर पावसामुळे कुणीही नसल्याने जीवितहानी टळली आहे. मात्र, हे झाड विजेच्या तारांवर पडल्याने विजेच्या तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला आहे.
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना कोठडी
राजूर : जुन्या वादातून मेहुण्याने साल्याचा खून केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को येथे उघडकीस आली होती. गजानन रामेश्वर सोनवणे असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी दहा तासांत आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बाबासाहेब मिसाळ, लक्ष्मण इंगळे, करण हराळ अशी संशयितांची नावे आहेत.
नागठाणाचा महसूल मंडलात समावेश करा
बदनापूर : बदनापूर तालुक्यातील वंजारवाडी ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये वंजारवाडी, नागठाणा, साखरवाडी, डापकातांडा या गावांचा समावेश आहे. यामध्ये या गावांचा मोठा कारभार असल्याने एकंदरीत विकास होत नाही. त्यामुळे नागठाणा व त्या जोडीला साखरवाडी घेऊन नवी ग्रामपंचायत करून नागठाणा गावाचा महसूल मंडलात समावेश करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
हनुमंतखेडा येथे १३० जणांचे लसीकरण
जाफराबाद : तालुक्यातील हनुमंतखेडा येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित शिबिरात ४५ वर्षांवरील १३० जणांचे लसीकरण करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र, खासगाव व ग्रामपंचायत कार्यालय, हनुमंतखेडा यांच्या विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सरपंच भक्त चव्हाण, उपसरपंच दीपाली भोपळे, गुलाब भोपळे, भगवान भोपळे, रामेश्वर भोपळे, दीपक भोपळे, जगदेव चव्हाण, महादू भोपळे आदी उपस्थित होते.
पार्थ मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील पाथरवाला येथे श्री पार्थ मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आरोग्यमंत्री राजेश टोपे व मनीषा टोपे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आली. यावेळी विजय कनुजे, जयेश टोपे, अर्जुन महाराज जाधव, राजेंद्र महाराज वाघमारे, गोंदी पोलीस ठाण्याचे पोनि. शीतलकुमार बल्लाळ, सपोनि दीपक लंके, पोलीस उपनिरीक्षक गजानन कौळासे, सभापती रईस बागवान, सुखापुरीचे सरपंच राखुंडे, पांडुरंग खराद, कैलास शिंगटे यांची उपस्थिती होती.