जालना जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:21 AM2018-10-21T00:21:59+5:302018-10-21T00:22:35+5:30
सरकारने तातडीने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शनिवारी भोकरदन, राजुर आणि वडीगोद्री येथे आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन, राजूर, वडीगोद्री : खरीप आणि रबी हंगाम दोन्ही धोक्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीपाचे उत्पन्न निसर्गाच्या लहरीपणामुळे ७५ टक्क्यांनी घटले तर रबी हंगामाची पेरणी होणेही अवघड झाले आहे. त्यामुळे सरकारने तातडीने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शनिवारी भोकरदन, राजुर आणि वडीगोद्री येथे आंदोलन करण्यात आले.
भोकरदन येथे माजी आ. चंद्रकांत दानवे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन निवेदन देण्यात आले. यामध्ये दुष्काळ जाहीर करणे, तसेच विविध योजनांच्या लाभार्थ्यांना तातडीने मदत करणे यासह रोजगार हमी योजनेची कामे सुरू करणे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश होता. या मोर्चामध्ये तालुकाध्यक्ष रमेश सपकाळ, सुधाकर दानवे, बबलू चौधरी, जिल्हाउपाध्यक्ष लक्ष्मण ठोंबरे, नंदकुमार गिºहे, बी़ एऩ कड, नईम कादरी, अशोक पवार, सुनीता सावंत, रणवीर देशमुख, शेख कदीर, अजहर शहा, महेश औटी, जयंत जोशी आदींची उपस्थिती होती.