अंतरवाली सराटी बनले राज्याचे हॉटस्पॉट; नेते मंडळींची गावात रीघ, मुख्य मार्गावर वाहनांच्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 07:58 AM2023-09-06T07:58:08+5:302023-09-06T07:58:15+5:30

अंतरवाली सराटी हे गाव सध्या महाराष्ट्राचे हॉटस्पॉट बनले आहे.  

Antarwali Sarati became the state's hotspot; Leaders flock to the village, queues of vehicles on the main road | अंतरवाली सराटी बनले राज्याचे हॉटस्पॉट; नेते मंडळींची गावात रीघ, मुख्य मार्गावर वाहनांच्या रांगा

अंतरवाली सराटी बनले राज्याचे हॉटस्पॉट; नेते मंडळींची गावात रीघ, मुख्य मार्गावर वाहनांच्या रांगा

googlenewsNext

- पवन पवार

वडीगोद्री (जि. जालना) : सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावर वसलेले अंतरवाली सराटी हे छोटेसे गाव. गावाची लोकसंख्या साडेतीन हजार. प्रमुख व्यवसाय शेती. गावात एकही हॉटेल नाही. दिवसातून फक्त एक बस किंवा तुरळक वाहने येतात. संपूर्ण रस्ता २४ तास मोकळा असतो. आज त्या गावात पाय ठेवायलाही तास लागतो. मागील सात दिवसांपासून व्हीआयपी मंडळींचा ताफा, दोन-दोन किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग. शेकडो दुचाकी, रोज हजारो लोक गावात येऊन जातात. अंतरवाली सराटी हे गाव सध्या महाराष्ट्राचे हॉटस्पॉट बनले आहे.  

मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे. हा ऐतिहासिक लढा आहे. याचा साक्षीदार म्हणून उपस्थित झालो. 
- लखन सावंत, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक

मी तुमच्या जातीचा-धर्माचा नसेल; पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत राहतो. यासाठी मी मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आलो आहे. 
- अकिफ देफदार, छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड महाराष्ट्र कार्याध्यक्ष, मुंबई

Web Title: Antarwali Sarati became the state's hotspot; Leaders flock to the village, queues of vehicles on the main road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.