चिंता वाढली : जिल्ह्यात वर्षभरात ११६७ जणांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:34 AM2021-09-12T04:34:32+5:302021-09-12T04:34:32+5:30

ते म्हणाले की, जगाचा विचार करता, २९१९ मध्ये दर ४० सेकंदाला एक जण आत्महत्या करत होते अशी धक्कादायक आकडेवारी ...

Anxiety increased: 1167 suicides in the district during the year | चिंता वाढली : जिल्ह्यात वर्षभरात ११६७ जणांची आत्महत्या

चिंता वाढली : जिल्ह्यात वर्षभरात ११६७ जणांची आत्महत्या

Next

ते म्हणाले की, जगाचा विचार करता, २९१९ मध्ये दर ४० सेकंदाला एक जण आत्महत्या करत होते अशी धक्कादायक आकडेवारी पुढे आली होती. भारताचा विचार करता, दरदिवशी आत्महत्या करणाऱ्याचे प्रमाण ३८१ इतके होते. तर जालन्याचा विचार करता, शेतकरी आत्महत्येसह अन्य नागरिकांनी मग त्यात युवक-युवती, महिला आणि पुरुषांचा विचार करता ही आकडेवारी ११६७ एवढी असल्याचे दिसून आले.

चौकट

आत्महत्या रोखण्यासाठी जागृती

आत्महत्या करणे हा गुन्हा मानला जात आहे. मिळालेले सुंदर जीवन केवळ तुलना, ताणतणाव, व्यसन आणि इर्ष्येसह रागातून आत्महत्या केल्या जात असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे. युवक-युवतींचा विचार करता, त्यांच्याकडून पालकांच्या वाढलेल्या अधिकच्या अपेक्षा यादेखील कारणीभूत असल्याचे दिसून आले. ही सर्व कारणे महत्त्वाची ठरतात. त्यामुळे वरील कारणांवर मात करण्यासाठी जागितक स्तरावर आता अधिकची जागृती करून समुपदेशन केले जात आहे.

अनेक तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

आत्महत्या करणे म्हणजे स्वत:ला संपवणे आहे. स्वत:ला संपवून प्रश्न सुटत नाहीत, तर ते अधिक गंभीर बनतात याचा विचार व्हावा. एखाद्या कर्ता पुरुषाने आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्यास त्याचे सर्व कुटुंब उघड्यावर येते. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच युवक-युवती हे नैराश्यात कसे जाणार नाहीत, हेही पालकांनी पाहिले पाहिजे. आत्महत्येचा विचार हा क्वचितच झटकन येतो. परंतु अनेक अभ्यासाअंती असे दिसून आले आहे की, सरासरी सहा महिने आधीपासूनच डिप्रेशनमध्ये गेलेली व्यक्ती ही शेवटचा जीवन संपविण्याचा मार्ग स्वीकारते असे दिसून आले आहे.

चौकट

एकत्रित कुटुंबात कमी प्रमाण

हल्ली एकत्र कुटुंब पध्दती लोप पावत असून, हम दो हमारे दो... असे समीकरण झाले आहे. त्यातच प्लॅटसंस्कृती वाढल्याने एकटेपण वाढले आहे. तसेच पालक आणि मुलांमधील संवाद कमी होणे हेदेखील एक गंभीर कारण आत्महत्या करण्यामागे असल्याचे दिसून आले आहे. आमच्या मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण देश आणि राज्यात या आत्महत्या रोखण्यासाठी व्याख्याने, समुपदेश शिबिरांचे आयोजन करत आहोत.

- डॉ. सूरज सेठिया, मानसोपचार तज्ज्ञ, जालना

Web Title: Anxiety increased: 1167 suicides in the district during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.