अर्ज दाखल करण्याची वेबसाईट सातत्याने हँग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:41 AM2020-12-30T04:41:27+5:302020-12-30T04:41:27+5:30

वडीगोद्री : मागील काही दिवसांपासून ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला असून, राखीव जागांवर निवडणूक लढविणाºया उमेदवारांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत ...

The application submission website hangs consistently | अर्ज दाखल करण्याची वेबसाईट सातत्याने हँग

अर्ज दाखल करण्याची वेबसाईट सातत्याने हँग

Next

वडीगोद्री : मागील काही दिवसांपासून ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला असून, राखीव जागांवर निवडणूक लढविणाºया उमेदवारांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. यातूनच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडे ऑनलाईन अर्ज दाखल करणाºयांची संख्या वाढली आहे. याचा परिणाम ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी असलेल्या सीसीव्हीआयएसची वेबसाईट हँग होण्यावर होत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांकडून भीती व्यक्त केली जात आहे.

राज्य निवडणूक आयोगाने मुदत संपलेल्या व कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यापासून सातत्याने गोंधळ सुरू आहे. यात आयोगाकडून रोज वेगवेगळे निकष येत असल्याने उमेदवार भांबावून गेले आहेत. यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून जात प्रमाणपत्र देखील पडताळणीसाठी दाखल करण्यासाठी ऑनलाईन प्रणालीच सुरू करण्यात आली आहे. यात इच्छुक उमेदवारांना ऑनलाइनशी संघर्ष करावा लागत आहे.

सरपंचपदाचे आरक्षण रद्द झाल्यानंतर निवडणुकीतील समीकरणे बदलली. त्यामुळे पूर्वी निश्चित झालेल्या उमेदवारांत बदल झाला. याचा परिणाम जात प्रमाणपत्र काढण्यापासून ते पडताळणी समितीकडे ऑनलाईन दाखल करण्यासाठी धावपळ सुरू झाली. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. असे असले तरी इच्छुकांकडून कागदपत्रांची जमवाजमव सुरूच आहे. यातूनच जात पडताळणी समित्यांकडे ऑनलाईन अर्ज मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. त्यामुळे जात पडताळणीची ऑनलाईन अर्ज प्रणाली हँग होत असल्याने निवडणूक लढवण्याची तयारी वाया जाण्याची भीती उमेदवारांमधून व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्हा समित्यांचे कामकाज सरकारने सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवले आहे. परंतु, ऑनलाईनच्या समस्यांमुळे इच्छुक हैराण झाले आहेत.

चौकट

वडीगोद्री येथील महा-ई-केंद्र चालक ज्ञानेश्वर छल्लारे म्हणाले, ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात येत आहे. परंतु, वेबसाईट सातत्याने हँग होत आहे. त्यामुळे उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज भरण्यास अडथळा निर्माण होत आहे.

Web Title: The application submission website hangs consistently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.