मास्क न वापरणाऱ्यांची शहरात धरपकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:31 AM2021-03-10T04:31:03+5:302021-03-10T04:31:03+5:30
विशेष म्हणजे, भोकरदन नाका येथील एका मिठाईच्या दुकानात सुरक्षित अंतराचे पालन होत नसल्याचे दिसून आल्याने, ती दुकान पालिकेच्या पथकाने ...
विशेष म्हणजे, भोकरदन नाका येथील एका मिठाईच्या दुकानात सुरक्षित अंतराचे पालन होत नसल्याचे दिसून आल्याने, ती दुकान पालिकेच्या पथकाने सील करून दंड वसूल केल्याचे सांगण्यात आले. जालन्याप्रमाणेच घनसावंगी, अंबड, भोकरदन, मंठा, जाफराबाद, बदनापूर येथेही पथकांनी मास्क न वापरणाऱ्यांवर धडक कारवाई केली. या प्रशासनाच्या कारवाईने नागरिक हलवादिल झाले असल्याचे दिसून आले. ज्यांना पोलिसांनी मास्क लावण्यासाठी विनंती करूनही थांबले नाहीत, अशांचे गाडी क्रमांक नोंदविले असून, त्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडूनही दंड वसूल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
चौकट
साडेतीन लाखांचा दंड वसूल
जालना जिल्ह्यातील चार पालिका आणि चार नगर पंचायतच्या हद्दीत गेल्या महिन्याभरात मास्क न लावणाऱ्यांकडून दंड वसूल केला जात आहे. आतापर्यंत जवळपास अडीच हजार नागरिकांकडून चार लाख रुपयांच्या जवळपास दंड वसूल केल्याची आकडेवारी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ही मास्क न लावणाऱ्यांची तपासणी मोहीम नियमतपणे राबविली जाणार असल्याचे सांगण्यात आले.