जालन्यात बाप्पांचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:07 AM2019-09-03T00:07:44+5:302019-09-03T00:08:29+5:30
जालना : गणपतीच्या आगमनापूर्वी वरूण राजाने जिल्ह्यात बऱ्यापैकी हजेरी लावल्याने गणेश उत्सवावरील मरगळ दूर झाली. गणपती बाप्पा मोरयाऽऽच्या निनादात आसमंत दुमदुमून गेला होता. गुलालाची उधळन करत लाडक्या बाप्पांचे स्वागत करून स्थापना करण्यात आली.
जालना : गणपतीच्या आगमनापूर्वी वरूण राजाने जिल्ह्यात बऱ्यापैकी हजेरी लावल्याने गणेश उत्सवावरील मरगळ दूर झाली. गणपती बाप्पा मोरयाऽऽच्या निनादात आसमंत दुमदुमून गेला होता. गुलालाची उधळन करत लाडक्या बाप्पांचे स्वागत करून स्थापना करण्यात आली. सकाळपासूनच बाजारपेठेत गणपती घेण्यासाठी बच्चे कंपनीसह युवकांनी मोठी गर्दी केली होती. पूजेसाठी लागणारे साहित्य तसेच बाप्पांचा आवडता प्रसाद मोदकांना मोठी मागणी असल्याचे दिसून आले. विविध प्रकारच्या सजावटींचे साहित्य तसेच खिरपतींचे प्रकार बाजारपेठेत उपलब्ध आहेत.
यंदाच्या गणेश उत्सवावर दुष्काळाचे सावट आहे. परंतु जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी वरूण राजाचे बºयापैकी पुनरागमन झाल्याने उत्साह वाढला होता. शहरातील मामाचौक, गांधीचमन, सिंधी बाजार, नेहरू रोड, शिवाजी पुतळा, जुन्या जालन्यातील शनिमंदिर, बाजार चौकी परिसरात गणपतीच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.
केळीचे खांब, दूर्वा, कन्हेरी, जास्वंदाची फूले घेताना ग्राहक दिसून आले. एकूणच हलक्याशा शिडकाव्याने देखील गणरायाचे स्वागत केले. चांगला पाऊस बरसेल अशा काळ्या ढगांची आकाशात गर्दी होती. परंतु जोरदार वाºयामुळे ढग पांगल्याने पाऊस बरसला नाही.
पूर्वी महालक्ष्मी समोर वेगवेगळ्या पध्दतीची सजावट करण्याची परंपरा होती. परंतु ती आता गणेश उत्सवातही रूढ झाली आहे. यासाठी बाजारपेठेत अनेक आकर्षक दागिने, गणपतीचे महावस्त्र विक्रीसाठी उपलब्ध आहेत. काही ठिकाणी तर गौरी-गणपतीचे सण लक्षात घेऊन सजाटीच्या सहित्याचे प्रदर्शनच भरविण्यात आले आहेत. या प्रदर्शनातील साहित्य खरेदीसाठी विशेष करून महिला आणि युवतींची गर्दी लक्षणीय आहे.