जालन्यात शेतकऱ्याने साकारले तब्बल २२ लाखांचे शेततळे; २ कोटी लिटर पाणी साठवण क्षमता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2022 11:15 AM2022-11-29T11:15:29+5:302022-11-29T11:15:45+5:30
शेततळ्याचे पहा ड्रोन कॅमेऱ्यातील विहंगम दृश्य
जालना - जालना एकदा शेतकऱ्याने काही करायचे ठरवले तर तो ते करून दाखवतोच. याचेच एक उदाहरण म्हणजे जालन्याचे शेतकरी लक्ष्मण सुरडकर. तब्बल 22 लाख रुपये खर्चून 2 एकरवर त्यांनी शेततळे तयार केले. याची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे.
जालना जिल्ह्यातील राणी उचेंगावाचे शेतकरी लक्ष्मण सुरडकर यांनी तबल 2 कोटी लिटर पाणी साठवण क्षमता असलेले 2 एकरवर शेततळ तयार केले आहे.शेतकरी लक्ष्मण सुरडकर यांनी परिसरात असलेल्या पाणी टंचाई वर उपाय म्हणून आपल्या 21 एकर रानात पाण्याची ही सोय केली. 52 फूट खोल असलेल्या या शेततळ्याला 22 लाख रुपयांचा खर्च आलाय, गोलाकार अशा या शेततळ्याचे ड्रोनच्या साह्याने विहंगम दृश्य पाहायला मिळते आहे.