खड्ड्यातून ट्रॅक्टर जाताच दोन मजूर खाली पडले, ट्रॉलीच्या चाकाखाली येऊन दोघांचाही मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 04:32 PM2024-06-21T16:32:39+5:302024-06-21T16:33:13+5:30

दोन मजुरांचा ट्रॅक्टर खाली येऊन मृत्यू, शहागड-गोंदी रस्त्यावरील अपघात

As the tractor passed through the ditch, two laborers fell down, falling under the wheel of the trolley and both died | खड्ड्यातून ट्रॅक्टर जाताच दोन मजूर खाली पडले, ट्रॉलीच्या चाकाखाली येऊन दोघांचाही मृत्यू

खड्ड्यातून ट्रॅक्टर जाताच दोन मजूर खाली पडले, ट्रॉलीच्या चाकाखाली येऊन दोघांचाही मृत्यू

शहागड ( जालना) : खड्ड्यातून ट्रॅक्टर जाताच दोन बांधकाम मजूर खाली पडून ट्रॉलीच्या मागच्या टायर खाली येऊन मृत झाल्याची घटना गुरुवारी सकाळी गोंदी - शहागड मार्गावर झाली.  दिलीप चुरोंजीलाल कलमे आणि करण अशी मृतांची नाव असून दोघेही मध्यप्रदेश येथील मूळ रहिवासी आहेत. 

गेवराई येथील एक ट्रॅक्टर गोंदी-शहागड महामार्गावर गुरुवारी सकाळी ९ वाजता बांधकाम मजूर घेऊन जात होते. गोंदी रोडवरील शहागडच्या ३३ केव्ही महाराष्ट्र विद्युत वितरणच्या सब स्टेशनसमोर आल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात ट्रॅक्टर आदळून ट्रॉलीमध्ये बसलेले दोन मजूर खाली पडून ट्रॉलीच्या मागच्या टायर खाली आले.

दिलीप चुरोंजीलाल कलमे ( २२, बांधकाम मजूर, रा.रामटेक शिराली जि. हरदा रा. मध्यप्रदेश, ह.मु. संजय नगर गेवराई जि.बीड) याला प्रथम शहागड येथील खाजगी दवाखान्यात हलवण्यात आलेले होते. परंतु या ठिकाणी न घेता सरकारी दवाखान्यात पाठण्यात आले. शहागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साद यांनी दिलीप चुरोंचीलाल याला तपासून मृत घोषित केले. तर दुसरा जखमी करण (रा. रामटेक शिराली जि. हरदा रा. मध्यप्रदेश, ह.मु संजय नगर ता. गेवराई जि.बीड) याला शहागड येथील खाजगी रुग्णालयात प्रथम उपचार करून रुग्णवाहिकेने छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम दवाखान्यात हलवण्यात आलेले होते. परंतु उपचारादरम्यान त्याचीही प्राणज्योत मावळली. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: As the tractor passed through the ditch, two laborers fell down, falling under the wheel of the trolley and both died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.