अशोक चव्हाण यांनी मध्यरात्री घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; १ वाजेपर्यंत चालली चर्चा

By विजय मुंडे  | Published: March 17, 2024 07:57 AM2024-03-17T07:57:31+5:302024-03-17T07:58:17+5:30

अशोक चव्हाण यांनी शनिवारी रात्री अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. शनिवारी रात्री ११:३० ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत ही चर्चा चालली.

Ashok Chavan met Manoj Jarange Patil late at night; The discussion lasted till 1 o'clock | अशोक चव्हाण यांनी मध्यरात्री घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; १ वाजेपर्यंत चालली चर्चा

अशोक चव्हाण यांनी मध्यरात्री घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; १ वाजेपर्यंत चालली चर्चा

वडीगोद्री (जि. जालना) :मराठा आरक्षणावर चर्चेतून मार्ग निघणे गरजेचे आहे. त्यासाठी जितके प्रयत्न करता येतील तितके प्रयत्न आपण करू, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिली. अशोक चव्हाण यांनी शनिवारी रात्री अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. शनिवारी रात्री ११:३० ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत ही चर्चा चालली.

मी आज शासनाचा प्रतिनिधी म्हणून नाही, तर समाज म्हणून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. आंदोलन सुरू असतानाही जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. आपण मराठा आरक्षण प्रक्रियेत यापूर्वीही काम केले आहे. समाजाच्या आरक्षणासाठी चर्चा करून समन्वयातून मार्ग काढणे गरजेचे आहे. आजच्या कॅबिनेटमध्ये काय घडले हे मला माहिती नाही. सगेसोयरे अध्यादेशावर हरकती आल्या आहेत. आज आचासंहिता लागू झाली आहे. त्यामुळे त्यावरील प्रक्रिया किती पूर्ण होईल हे आताच सांगता येत नाही. समाजाचा प्रश्न समन्वयातून सुटावा यासाठीच आपण प्रयत्न करणार असल्याचे चाव्हण म्हणाले.

२४ तारखेला समाजाची बैठक: जरांगे पाटील
 सरकारने फसवणूक केल्याचे आपण अशोक चव्हाण यांना सांगितले आहे. सगेसोयरेची अंमलबजावणी नाही. गुन्हे मागे घ्यायचे सोडून अधिक गुन्हे दाखल केले जात आहेत. हैदराबादचे गॅजेट्स घेतले नाही. यासह समाजाच्या मागण्या, प्रश्न, शासनाकडून होणारी फसवणूक त्यांच्यासमोर मांडली आहे. ते त्यांच्या परीने प्रयत्न करतील. आता आम्ही २४ मार्च रोजी समाजाची बैठक लावली आहे. त्यात मराठ्यांची पुढील दिशा ठरेल असे मनोज जरांगे पाटील यांनी मध्यामाशी बोलताना सांगितले.

Web Title: Ashok Chavan met Manoj Jarange Patil late at night; The discussion lasted till 1 o'clock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.