आष्टी दरोडा प्रकरण; तीन आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 01:19 AM2018-11-13T01:19:56+5:302018-11-13T01:20:09+5:30

परतूर तालुक्यातील आष्टी येथील भांड्याचे व्यापारी देवीदास ढोके यांच्या घरी १० नोव्हेंबरला चार चोरट्यांनी दरोडा टाकून सहा लाख रुपयांचा ऐवज आणि रोख रक्कम लांबविली होती ब-हाणपूरच्या बाजारात चित्रपटाला शोभेल असा पाठलाग करून आरोपींना अटक केल्याचे सांगण्यात आले.

Ashti Dacoity Case; Three accused arrested | आष्टी दरोडा प्रकरण; तीन आरोपी जेरबंद

आष्टी दरोडा प्रकरण; तीन आरोपी जेरबंद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : परतूर तालुक्यातील आष्टी येथील भांड्याचे व्यापारी देवीदास ढोके यांच्या घरी १० नोव्हेंबरला चार चोरट्यांनी दरोडा टाकून सहा लाख रुपयांचा ऐवज आणि रोख रक्कम लांबविली होती. या प्रकरणातील आरोपी मध्यप्रदेशात गेल्याचा सुगावा स्थानिक गुन्हे शाखेला लागला होता. त्यानुसार तेथे विशेष पथक पाठवून तीन आरोपींना अटक केली. यावेळी ब-हाणपूरच्या बाजारात चित्रपटाला शोभेल असा पाठलाग करून आरोपींना अटक केल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आष्टी व परिसरात चोऱ्या, दरोड्याचे प्रमाण गेल्या काही महिन्यांमध्ये वाढले आहे. ढोके यांच्याकडे पडलेला हा चौथा मोठा दरोडा आहे. दरम्यान या दरोडे खोरांनी चाूकचा धाक दाखवून सोन्याचे दागिने आणि रोख ९० हजार रुपये लंपास केले होते. यावेळी महिलांनाही चाूकचा धाक दाखविण्यात आला होता. या दरोड्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या दरोड्याचा तपास तातडीने लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. दरोडा पडल्यानंतर व्यापा-यांनी एकत्रित येऊन आष्टी बंद ठेवले होते.
ग्रामस्थांचा रोष लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने तपासाची चक्रे फिरवली.

Web Title: Ashti Dacoity Case; Three accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.