सहायक फौजदार लाचेच्या सापळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:39 AM2018-11-16T00:39:25+5:302018-11-16T00:39:47+5:30

चंदनझिरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला सहकायक फौजदार दिलीप कचरूसिंग ठाकूर याला एसीबीने पाच हजार रूपयांची लाच स्वीकारताना गुरूवारी अटक केली.

ASI trapped by ACB | सहायक फौजदार लाचेच्या सापळ्यात

सहायक फौजदार लाचेच्या सापळ्यात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील चंदनझिरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला सहकायक फौजदार दिलीप कचरूसिंग ठाकूर याला एसीबीने पाच हजार रूपयांची लाच स्वीकारताना गुरूवारी अटक केली. यापूर्वी संबंधितांकडून ठाकूर याने १० हजार रूपयांची लाचेची रक्कम घेतली होती, ही लाच ठाकूरने पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींना मारहाण न करण्यासह जामीन मिळवून देण्यास मदत करण्याच्या नावाखाली घेतल्याचे एसीबीने सांगितले.
चंदनझिरा पोलीस ठाणे हद्दीत आठवड्याभरापूर्वी झालेल्या एका भांडणातील सहा आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी संबंधित संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. यावेळी पोलीस कोठडीत मारहाण न करण्यासह पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर जामीन मिळवून देण्यासाठी देखील प्रयत्न करावयाचे असल्यास १८ हजार रूपयांची लाच द्यावी लागेच असे ठाकूरने सांगितले होते. दरम्यान, यापूर्वी याच प्रकरणात तडजोड होऊन १५ हजार रूपये देण्याचे ठरले. त्यानुसार त्यातील दहा हजार रूपये ठाकूरने स्विकारले होते.
उर्वरित पाच हजार रूपयांची लाच देण्याचा तगादा ठाकूरने संबंधितांकडे केला होता. तत्पूर्वी तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने एसीबीकडे ठाकूर यांची तक्रार केली. तसेच मोबाईलवरून संपर्क करून पाच हजार रूपये देण्यासाठी कुठे यावे अशी विचारणा केली असता, ठाकूरने नूतन वसाहत परिसरातील एका हॉटेलमध्ये येण्याचे सांगितले. त्यानुसार गुरूवारी पाच हजार रूपयांची लाच घेतांना ठाकूरला एसीबीने सापळा लावून रंगेहात पकडले. त्याला अटक करण्यात आली असून, कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: ASI trapped by ACB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.