दुचाकी चोर अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 12:32 AM2018-10-04T00:32:05+5:302018-10-04T00:32:21+5:30

स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी दुचाकी चोरास अटक करुन त्यांच्याकडून चार दुचाकी व सात बॅटऱ्या जप्त केल्या.

Attacks a bike thief | दुचाकी चोर अटकेत

दुचाकी चोर अटकेत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी दुचाकी चोरास अटक करुन त्यांच्याकडून चार दुचाकी व सात बॅटऱ्या जप्त केल्या. सचिन ज्ञानदेव लोंढे (वय. ३४, रा. नुतन वसाहात जालना ) असे आरोपींचे नाव आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून सचिन लोंढे यांचा शोध घेऊन त्याची विचारपूस केली असता, त्यांने कडबी मंडी येथून एक होंन्डा शाईन, जालना व परभणी येथून एक हिरो करिझ्मा व एक बजाज कंपनीची दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून १ लाख ३० रुपये किंमतीच्या तीनही दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. त्यानंतर पार्किंगमध्ये उभा असलेल्या वाहनांच्या बॅटºया चोरणाºया टोळीला अटक करुन त्यांच्याकडून २९ हजार रुपये किंमतीच्या ७ बॅट-या व ३० हजार रुपये किंमतीची दुचाकी, ५ हजार रुपये किमतीचा एक मोबाईल असा एकूण ६४ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. नितीन सुरेश गंगातीवरे (२२ रा. रमाबाई नगर मोतीबाग), जितेंद्र केलास मोरे (२१, रा. सिध्दी विनायक नगर चंदनझिरा), कृष्णा बाबूराव मोगे (२०, रा. म्हडा कॉलनी टी.व्ही. सेंटर ) असे ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.
सदरील कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. राजेंद्रसिंह गौर, पोउपनि. जयसिंग परदेशी, विश्र्वनाथ भिसे, सॅम्युअल कांबळे, रंजित वैराळ, समाधान तेलंग्रे, अंबादास साबळे, सचिन चौधरी, विलास चेके, लखन पचलोरे, परमेश्र्वर धुमाळ, सोमनाथ उबाळे, राहुल काकरवाल, किशोर जाधव यांनी केली. या कारवाईमुळे चोरट्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

Web Title: Attacks a bike thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.