बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 00:46 IST2019-10-08T00:45:48+5:302019-10-08T00:46:07+5:30
अंबड तालुक्यातील जामखेड येथील युनियन बँक आॅफ इंडिया शाखेतील तिजोरी फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली

बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड येथील युनियन बँक आॅफ इंडिया शाखेतील तिजोरी फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली असून, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
जामखेड येथील युनियन बँक आॅफ इंडिया बँकेच्या शाखेतील शिपाई अनिल पांजगे यांनी सोमवारी सकाळी बँक उघडल्यावर ही घटना समोर आली. बँकेच्या स्लाइडिंग खिडकीचे गज तांबीने वाकवून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केल्याची माहिती शाखा व्यवस्थापक सिध्देश्वर काळघे यांना दिली. चोरट्यांनी तिजोरी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याप्रकरणी ग्रामीण विकास अधिकारी गजानन मंगरुळकर, अमर पिसे यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या घटनेने गावात खळबळ उडाली होती. तर बँकेतील व्यवहार ठप्प झाले होते. सोमवारी जामखेड येथील आठवडी बाजार होता. मात्र, बँकेतील व्यवहार ठप्प असल्याने बाजारातील उलाढालीवर त्याचा परिणाम झाला. घटनास्थळी आय बाईक, डॉग स्कॉडने भेट दिली. परंतु श्वान बँकेच्या आवारात घुटमळले. घटनास्थळी जमादार पी.डी. पाटील, आर.सोनोने, लोखंडे आदी उपस्थित होते.