गुप्त धनाच्या हव्यासापोटी विवाहितेचा नरबळी देण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:02 PM2019-08-20T12:02:17+5:302019-08-20T12:06:37+5:30

नरबळी देण्यासाठी होम हवनाची तयारी करून डोक्याच्या केसाची एक बट कापली.

Attempts to offer a sacrificial lamb for the sake of the secret money in Jalana | गुप्त धनाच्या हव्यासापोटी विवाहितेचा नरबळी देण्याचा प्रयत्न

गुप्त धनाच्या हव्यासापोटी विवाहितेचा नरबळी देण्याचा प्रयत्न

googlenewsNext
ठळक मुद्देअमानुषपणे वागणुक देत जादूटोना करण्यास सुरूवात केली.

गोंदी (जि. जालना) : गुप्त धनाच्या हव्यासापोटी एका विवाहितेचा नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणाविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास अंबड तालुक्यातील दह्याळा या गावात घडली.

दह्याळा येथील विवाहिता माया एकनाथ मगरे (ह.मु. तांबी ता. शेगाव) यांनी सोमवारी गोंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गुप्तधन काढण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास विवाहिता माया मगरे यांना पती एकनाथ नारायण मगरे, सासू शशिकला नारायण मगरे, सासरा नारायण रामचंद्र मगरे, दीर नवनाथ नारायण मगरे, नणंद मनिषा नारायण मगरे (सर्व रा. दह्याळ), मामा सासरे बाबासाहेब वारे (रा. खामगाव) यांनी संगणमत करून अंघोळ घालून उलटे टांगले.

नरबळी देण्यासाठी होम हवनाची तयारी करून डोक्याच्या केसाची एक बट कापली. त्यानंतर अमानुषपणे वागणुक देत जादूटोना करण्यास सुरूवात केली. त्यावेळी मी कशीबशी सुटका करून माहेरी गेले आणि घडला प्रकार नातेवाईकांना सांगितल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. विवाहितेच्या तक्रारीवरून वरील सहा जणांविरूध्द अंधश्रध्दा कायदा महाराष्ट्र नरबळी अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोना समुळ उच्चाटन प्रतिबंध कायद्यानुसार गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि. सय्यद नासीर हे करीत आहेत.

Web Title: Attempts to offer a sacrificial lamb for the sake of the secret money in Jalana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.