मतदानानंतर कर्तव्यावर हजर राहण्यास सूट द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:35 AM2021-01-16T04:35:44+5:302021-01-16T04:35:44+5:30
मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या दिवशी निवडणूक साहित्य व मतदान पेट्या जमा करताना ...
मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या दिवशी निवडणूक साहित्य व मतदान पेट्या जमा करताना मतदान अध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत कार्यमुक्त केले जात नाही. रात्री उशीर होत असल्याने बहुतांश कर्मचाऱ्यांना साहित्य जमा करण्याच्या ठिकाणी मुक्कामी थांबावे लागते. या कारणाने अनेक कर्मचाऱ्यांना दुसऱ्या दिवशी कार्यालयामध्ये कर्तव्यावर उपस्थित राहणे शक्य होत नाही. या बाबीचा विचार करून राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी ११ डिसेंबर २०२० रोजी पत्र काढून १६ जानेवारीला मतदानाच्या दुसऱ्या कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर हजर राहण्यासाठी सूट देण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्याच अनुषंगाने परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मतदान अधिकाऱ्यांना कर्तव्यावर हजर राहण्यापासून सूट दिली आहे. याच धर्तीवर जालना जिल्ह्यातील मतदान अधिकाऱ्यांना १६ जानेवारीला कर्तव्यावर हजर राहण्यापासून सूट द्यावी, अशी मागणी प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष संतोष राजगुरू यांच्यासह बी. आर. काळे, फेरोज बेग, योगेश झांबरे, मुकेश खरात, आर. एम. फटाले, अमोल तोंडे, ए. आय. मोमीन, राजेंद्र लबासे, सोमनाथ बडे, सुरेश धानुरे, गिरीधर राजपूत, संदीप पितळे, कैलास गवळी, लहू राठोड, बालाजी माने, एस. एस. वाघमारे, गणेश लादे, शिवाजी आडसूळे, ज्ञानेश्वर घनवट, गणेश तायडे, रामेश्वर दहिवाळ, दत्ता वाघमारे, फारूख सय्यद, बसवराज आंबदे, मुकेश गाडेकर, लहू वीर, गोविंद नाईक आदींनी केली आहे.