सन्मान योजनेत समाविष्ट करण्यास टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:42 AM2019-02-27T00:42:38+5:302019-02-27T00:43:15+5:30
जाफराबाद पंतप्रधान सम्मान योजनेतील लाभार्थ्यांची यादी देऊनही यादीत नावे समाविष्ट करण्यास तलाठी टाळाटाळ करीत आहेत. याबाबत ग्रामस्थांनी लेखी निवेदन देवून संबंधित तलाठ्यावर कारवाईची मागणी तहसीलदारांकडे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद/टेंभुर्णी : जाफराबाद पंतप्रधान सम्मान योजनेतील लाभार्थ्यांची यादी देऊनही यादीत नावे समाविष्ट करण्यास तलाठी टाळाटाळ करीत आहेत. याबाबत ग्रामस्थांनी लेखी निवेदन देवून संबंधित तलाठ्यावर कारवाईची मागणी तहसीलदारांकडे केली आहे.
जाफराबाद तालुक्यातील सावंगी येथील ग्रामस्थांनी जाफराबाद तहसीलदारांना मंगळवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.की, पंतप्रधान सम्मान योजनेतील लाभार्थ्यांंची यादी विहीत मुदतीत सर्व पुराव्यानिशी ग्रामपंचायतमार्फत तलाठ्याकडे मान्यतेसाठी देण्यात आली. मात्र संबंधित तलाठ्याने या यादीतील काही नावांना मंजूरीसाठी पाठविले तर काहीं नावे जाणूनबुजून वरिष्ठांकडे पाठविण्याचे टाळले. यामुळे गावातील अनेक पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचीत राहीले आहे. दरम्यान याबाबत त्वरीत चौकशी करून याकामीले टाळाटाळ करणारया सावंगी सजेच्या तलाठ्यावर कारवाई करावी. व या योजनेच्या लाभापासून कोणीही वंचीत राहणार नाही याची दक्षता घ्यावी. अशी मागणी केली. निवेदनावर सरपंच स्वाती वरगणे, किशोर वरगणे, संतोष वरगणे, बाबुराव आढावे, सुरज आढावे, नंदू वरगणे, विलास वरगणे, दादाराव सोनवणे ,सुरज आढावे, किरण आढावे, इद्रीस पठाण, बबन राऊत, सखाराम वरगणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.