व्यसनांपासून दूर राहणे हाच कॅन्सरमुक्तीवर जालीम इलाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:26 PM2020-02-25T23:26:27+5:302020-02-25T23:26:56+5:30

तंबाखू तसेच सिगारेट, विडी आणि अतिमद्यपानामुळे कॅन्सर जडण्याची दाट शक्यता असते

Avoiding addictions is a cure for cancer relief | व्यसनांपासून दूर राहणे हाच कॅन्सरमुक्तीवर जालीम इलाज

व्यसनांपासून दूर राहणे हाच कॅन्सरमुक्तीवर जालीम इलाज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : तंबाखू तसेच सिगारेट, विडी आणि अतिमद्यपानामुळे कॅन्सर जडण्याची दाट शक्यता असते. यासह शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ हे देखील एक मुख्य कारण कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे मार्गदर्शन येथील पंचमुखी महादेव मंदिर परिसरात करण्यात आले. महाशिवरात्री निमित्त रमाई सेवाभावी संस्थेकडून ही जाणीव जागृती करण्यात आली.
महाशिवरात्री निमित्त दरवर्षी येथील पंचमुखी महादेव मंदिरात मोठी यात्रा भरते. या यात्रे दरम्यान महादेवाच्या दर्शनासाठी हजारो भाविक येतात. त्यामुळे ही संधी साधून रमाई संस्थेच्या अ‍ॅड. दीपाली भालशंकर कैलास जीगे, सुधाकर मुळे, जाधव यांनी कॅन्सर संदर्भातील विविध कारणे आणि त्यांची लक्षणे यावर मार्गदर्शन केले. सिगारेट, विडी आणि अति मद्यपानापसून नागरिक आणि विशेष करून युवकांनी यापासून दूर राहिले पाहिजे. कॅन्सरची लक्षणे आणि त्यावरील उपाय या बद्दलही सविस्तर माहिती दिली गेली. कॅन्सर हा ज्या प्रमाणे व्यवसांमुळे होतो, तो तसेच शरिरातील पेशींची झपाट्याने होणारी अनियंत्रित वाढ हे देखील यासाठी कारणीभूत आहे. ज्यांना व्यसन नाही अशांनाही कधी-कधी कॅन्सर झाल्याची उदाहरणे आहेत.
कॅन्सरवर आज अनेक महत्वपूर्ण आणि आधुनिक उपचार निर्माण झाले आहेत. असे असले तरी हे उपाय अत्यंत महाग आणि त्यातूनही रूग्ण बरा होईल असे खात्रीशीर सांगता येत नाही. त्यामुळे नियिमित आरोग्य तपासणी करणे हे देखील एक चांगले लक्षण मानले जाते. विशेष करून आहारवरील नियंत्रण हा देखील उपाय आहे. आहारात तेलकट, तूपकट पदार्थ टाळणे तसेच नियमितपणे फळांचे सेवन आणि हलका आहार हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Web Title: Avoiding addictions is a cure for cancer relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.