चणेगांवात पाणी बचतीवर जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:27 AM2021-03-07T04:27:33+5:302021-03-07T04:27:33+5:30

अलिकडे बेसुमार पाणी उपसा व पाण्याचा अपव्यय होत असल्याने नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणी ...

Awareness on water conservation in Chanegaon | चणेगांवात पाणी बचतीवर जनजागृती

चणेगांवात पाणी बचतीवर जनजागृती

Next

अलिकडे बेसुमार पाणी उपसा व पाण्याचा अपव्यय होत असल्याने नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणी टंचाई झळा बसू नये, यासाठी पाण्याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे. पाण्याची नासाडी टाळावी, असे आवाहन तेजसचे अध्यक्ष शिवाजी तायडे यांनी केले. कमी पाण्यात पिके घेण्यासह घरात नाहक पाणी वाया जाणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेतल्यास नागरिकांना पाणी समस्येला तोंड देण्याची गरज पडणार नाही, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच गावात पाणी बचत विषयी माहीती पत्रक वाटप करण्यात आले. यावेळी शिवाजी तायडे, कडूबा तायडे, गौतम तायडे, रमेश निहाळ, संतोष हाळदे, दत्ता तायडे, रोहन मगरे, प्रल्हाद जायभाये, केशव कोल्हे, बाबू पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

===Photopath===

060321\06jan_25_06032021_15.jpg

===Caption===

राजूर

Web Title: Awareness on water conservation in Chanegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.