शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ बहुजन वंचित आघाडीचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:27 AM2021-03-07T04:27:38+5:302021-03-07T04:27:38+5:30
आष्टी- दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन ...
आष्टी- दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या संदर्भात केलेले तीन कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होऊ शकतो. हे कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांचे केंद्र सरकार विरोधात आंदोलन चालू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परतूर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी चोखाजी सौंदर्य, अच्युत पाईकराव, प्रभाकर प्रधान, जयपाल भालके, संजय देशमाने, बाबू गोसावी, रोहन वाघमारे, विष्णू गायकवाड, सोमेश्वर गायकवाड, सोयब पठाण, गौतम मस्के, उत्तम साळवे, प्रकाश डोळस, सुरेश मुंढे, निवृत्ती पाईकराव, राजेश साळवे, शेख जमीर आदींची उपस्थिती होती.
.............
धरणे आंदोलनात सहभागी झालेले वंचित आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते.