बालनाट्य निर्मिती हीच नाट्यांकुर महोत्सवाची भरभराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 12:55 AM2020-01-07T00:55:56+5:302020-01-07T00:56:47+5:30
दरवर्षी नव्याने निर्माण होत असलेली बालनाट्य निर्मिती हीच नाट्यांकुरची समृध्द भरभराट आहे, असे प्रतिपादन नाट्यांकुरचे सचिव सुंदर कुंवरपुरिया यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : बालनाट्य निर्मिती हे सर्वात कठीण काम आहे. तर बालक हा जगातील सर्वात कठीण प्रेक्षक आहे. नाट्यलेखक लिहिते व्हावेत, नवीन संहिता तयार व्हाव्यात, याच उद्देशाने कार्यरत असलेल्या नाट्यांकुर बालनाट्य महोत्सवात दरवर्षी नव्याने निर्माण होत असलेली बालनाट्य निर्मिती हीच नाट्यांकुरची समृध्द भरभराट आहे, असे प्रतिपादन नाट्यांकुरचे सचिव सुंदर कुंवरपुरिया यांनी विजेत्यांना पारितोषिक वितरण करताना केले.
शहरातील मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात सुरू असलेल्या ४१ व्या बालनाट्य महोत्सवाचा रविवारी समारोप झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक राजेंद्र जैस्वाल हे होते. यावेळी संजय देशमुख, नाट्यांकुरचे अध्यक्ष ध. स. जैन, प्रकल्प प्रमुख आशिष रसाळ, जयेश पहाडे, माया कुंवरपुरिया, शाम जवादे, चैताली जवादे, परीक्षक प्रा. अनंत चौधरी, रूपाली सेठ, सुनीता देशमुख, दिनेश संन्यासी, गुलाबराव पाटील, शशिकांत सैबे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेत मांडवा येथील बारवाले विद्यालयाचा संघ सर्वोत्कृष्ट ठरला तर समूह नृत्यात किड्स केंब्रिजच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला.
सुंदर कुंवरपुरिया म्हणाले, नाट्यलेखन होत नाही अशी ओरड केली जाते. मात्र याला अपवाद नाट्यांकुर महोत्सव असून, दरवर्षी १५ एकांकिकांचे नव्याने लेखन होते. दिग्दर्शक, बालकलावंतामधील सृजनशीलतेला प्रकाशात आणणे हीच नाट्यांकुरची परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. अनंत चौधरी, दिनेश संन्यासी यांनी मार्गदर्शन केले. संचालन रसाळ यांनी केले. जैन यांनी आभार मानले. एकांकिकेमध्ये बारवाले विद्यालय, मांडवा (सर्वोत्कृष्ट), विठ्ठल. मा. शा. (द्वितीय), जिजामाता प्रा. शा. (तृतीय). प्राथमिक विभाग :- आर. एच. व्ही. स्कूल (प्रथम), दानकुंवर कन्या वि. ((व्दितीय), मराठी कन्यापाठ शाळा (तृतीय), हायल हिंदी :- आर. पी. बदनापूर (प्रथम), आश्लेषा इं. स्कूल (द्तिीय), न्यू पब्लिक स्कूल (तृतीय), ग्रामीण प्राथमिक :- बारवाले मांडवा (प्रथम), किंग्स शिवाजी रेवगाव (व्दितीय), आसाराम पाटील विद्यालय घाणेवाडी (तृतीय) आदी विजेते ठरले आहेत.
एकांकिकेच्या सहभागी सर्व अडीच हजार कलावंतांमधून सर्वोत्कृष्ट पुरूष अभिनयाचा मान शुभम चंद (बारवाले विद्यालय, मांडवा) यास मिळाला तर सर्वोत्कृष्ट स्त्री अभिनयात प्रियंका ज-हाड (आर.पी. इं. स्कूल बदनापूर) हे मानकरी ठरले. त्यांना स्व. सागर जोशी चषक देण्यात आले.