जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 10:59 PM2017-09-20T22:59:27+5:302017-09-20T22:59:52+5:30

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी काही शेतकºयांच्या जमिनी खरेदीस सुरुवात झाली असताना, विविध मागण्यांसाठी शेतकरी हक्क व बचाव कृती समितीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला.

The Ballagadi Front at District Collectorate in Jalna | जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा

जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी हक्क व बचाव कृती समितीचा ‘समृद्धी’ला विरोध

जालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी काही शेतकºयांच्या जमिनी खरेदीस सुरुवात झाली असताना, ती बंद करण्याच्या मागणीसाठी शेतकरी हक्क व बचाव कृती समितीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला.
गांधीचमन चौकातून दुपारी एक वाजता  बैलगाडीसह काढण्यात आलेल्या या मोर्चात गोकुळवाडी, अकोला, नीकळक, गुंडेवाडी, जामवाडी, पानशेंद्रा येथील शेतकºयांनी सहभाग घेतला. रेल्वेस्टेशन, उड्डाणपूल, अंबड चौफुली मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचला. दरम्यान, मोर्चा उड्डाणपुलावर आल्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला. मात्र,  न थांबता मोर्चात सहभागी शेतकरी तसेच पुढे गेले. मागण्यांचे  एक निवेदन कृती समितीने जिल्हाधिकाºयांना दिले. विहिरी, झाडे व कुपनलिका असलेल्या शेतकºयांना बागायती प्रमाणे मोबदला द्यावा, शहराजवळील जामवाडी, श्रीकृष्णनगर, गुंडेवाडी, निधोना, आंबेडकरनगर, खादगाव या गावांना औद्योगिक जमिनीप्रमाणे दर देण्यात यावे, नवनगरांचे आरक्षण रद्द करावे, शेतकºयांना जमीन खरेदीनंतर दिला जाणारा मोर्चा करमुक्त असावा आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

Web Title: The Ballagadi Front at District Collectorate in Jalna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.