सावधान! जमिनीचा पोत खालावतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:09 AM2017-12-05T00:09:46+5:302017-12-05T00:09:53+5:30
‘धरणी माता तुम्हाला घालती साद, आरोग्य तिचे रक्षुनिया द्या तिला प्रतिसाद’, असे शेतकºयांना सांगण्याची वेळ आता कृषी विभागावर आली आहे. रासायनिक खतांचा असंतुलित वापर, जमीन सतत पिकांखाली राहणे, पाण्याचा अयोग्य वापर यामुळे जिल्ह्यातील जमिनीचा पोत खालावत चालला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : ‘धरणी माता तुम्हाला घालती साद, आरोग्य तिचे रक्षुनिया द्या तिला प्रतिसाद’, असे शेतकºयांना सांगण्याची वेळ आता कृषी विभागावर आली आहे. रासायनिक खतांचा असंतुलित वापर, जमीन सतत पिकांखाली राहणे, पाण्याचा अयोग्य वापर यामुळे जिल्ह्यातील जमिनीचा पोत खालावत चालला आहे.
जमिनीत पिकांसाठी पोषक मूल्य व सुक्ष्म अन्न घटकांचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी पिकांची वाढ खुंटणे, उत्पादनाच्या गुणवत्तेची घट, जमीन नापिक होणे, उत्पादनात घट येण्याच्या समस्या वाढल्या असून, ही धोक्याची घंटा असल्याचे मृद तज्ज्ञ सांगत आहेत.
जालना जिल्ह्यातील जमीन मध्यम प्रकारची काळ्या मातीची आहे. ६२ टक्के जमीन ७५ टक्क्यांपेक्षा कमी खोलीची आहे. त्यामुळे पिके लवकर पाण्यावर येतात. जमिनीत पिकांसाठी आवश्यक असलेले स्फुरद, नत्र व पालाश या मुख्य अन्नद्रव्यांचे प्रमाण १-१४० किलोग्रम प्रति हेक्टर असणे आवश्यक आहे.
मात्र, माती परिक्षणामध्ये जिल्ह्यातील जमिनीमध्ये या अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी आढळून आले आहे. त्याचबरोबर लोह, जस्त, मॅग्निज, तांबे, बोरॉन, सल्फर या पिकांना आवश्यक असलेल्या सुक्ष्म अन्नद्रव्यांचे जमिनीतील प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण कमी झाले असून, पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेवरही परिणाम होत आहे. मातीची धूप वाढली आहे. त्यातच माती परीक्षणाशिवाय रासायनिक खतांचा केला जाणार भरमसाठ वापर जमिनीसाठी हानिकारक ठरत आहे. शेतकºयांनी खालावलेला जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेणखत, गांडूळ खतांबरोबर सेंद्रीय खतांचा वापर वाढवावा, माती परिक्षण करून मृदा आरोग्य पत्रिकेच्या आधारे पिकांना खते द्यावीत, असा निकरीचा सल्ला मृद तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
दोन लाख मृदा आरोग्य पत्रिकांचे वाटप
४जालना येथील खरपुडी कृषी विज्ञान केंद्रातील भूमी आरोग्य चिकित्सालय आणि कृषी विभागाच्या माध्यमातून मागील काही वर्षांमध्ये जिल्ह्यातील शेतकºयांमध्ये मृदा परीक्षणाबाबत व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. कृषी विज्ञान केंद्रामार्फत दोन लाख शेतकºयांना मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले आहे.
४या आरोग्य पत्रिकेतील सल्ल्यानुसारच शेतकºयांना कोणत्या पिकांसाठी किती प्रमाणात खतांचा वापर करावा, याची शास्त्रशुद्ध माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे विज्ञान केंद्राचे विषय तज्ज्ञ राहुल चौधरी यांनी सांगितले.