औरंगाबादेत पानतावणे संशोधन केंद्र स्थापन व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:56 AM2018-10-29T00:56:31+5:302018-10-29T00:59:12+5:30

येथे दोन दिवस सुरू असलेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाची रविवारी रात्री सांगता झाली. यात एकूण १० ठराव मंजूर करण्यात आले.

To be established at Aurangabad, a Patna Research Center should be established | औरंगाबादेत पानतावणे संशोधन केंद्र स्थापन व्हावे

औरंगाबादेत पानतावणे संशोधन केंद्र स्थापन व्हावे

Next
ठळक मुद्देसाहित्य संमेलनात ठरावअस्मितादर्श साहित्य संमेलनाची सांगता

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना (पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे साहित्यनगरी) : येथे दोन दिवस सुरू असलेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाची रविवारी रात्री सांगता झाली. यात एकूण १० ठराव मंजूर करण्यात आले. त्यात प्रामुख्याने औरंगाबाद येथे पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे संशोधन केंद्र स्थापन करण्याच्या ठरावाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात संमती देऊन स्वागत केले.
मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात ३५ वे अस्मितादर्श साहित्य संमेलन पार पडले. समारोप कार्यक्रमास आ. राजेश टोपे, स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवी तूपकर, प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर, सुधाकर गायकवाड, संमेलनाचे अध्यक्ष डी.बी. जगत्पुरीया, स्वागताध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील, निवेदीता पानतावने, राम गायकवाड, प्रा. विजय कुमठेकर यांच्यासह संयोजन समितीचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी राजेश टोपे, रवी तूपकर तसेच लुलेकर आणि गायकवाड यांनी मार्गदर्शन करून अस्मितादर्श साहित्य संमेलनातून समाजाला एक नवीन दिशा मिळते. साहित्यातून समाजाचे खरे प्रतिबिंब चित्रित होते असे सांगण्यात आले. या संमेलनात विविध ठराव संमत करण्यात आले आहे.
या ठरावाचे वाचन साहित्य संमेलनाचे सचिव राम गायकवाड यांनी केले.या ठरावांमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र शासनातर्फे पद्मश्री डॉ.गंगाधर पानतावणे साहित्य संशोधन केंद्राची स्थापना औरंगाबादेत व्हावी, भारतीय संविधानाचा समावेश शालेय ते उच्च शिक्षणापर्यंतच्या अभ्यासक्रमात करण्यात व्हावा, अस्मितादर्श साहित्य संमेलनास शासकीय अनुदान देण्यात यावे, अजिंठा लेणी परिसरात होवू घातलेल्या पाली विद्यापीठाची स्थापना तातडीने करण्यात यावी, महाराष्ट्र लोकसेवा आयोग व यूपीएससीच्या परीक्षा अभ्यासक्रमामध्ये पाली भाषेचा पुनश्च समावेश करावा, समतेची शिकवण देणाऱ्या बौद्ध संस्कृती व साहित्याचे सांस्कृतिक वारसा म्हणून संवर्धन व जतन शासनाने करावे, प्रसारमाध्यमे, साहित्यिक, पत्रकार, अल्पसंख्यांक, महिला, विचारवंत यांच्यावर होणारे हल्ले आणि अत्याचाराचा निषेध यावेळी करण्यात आला. संविधानाचा अपमान करणा-या प्रवृत्ती व संघटनांचा यावेळी निषेध नोंदविला. मराठवाडा हा कायमस्वरूपी दुष्काळवाडा बनत चालला आहे. तरी शासनाने दुष्काळ निवारणार्थ कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळावे यावरही चर्चा करण्यात येऊन ठराव मंजूर करण्यात आला.
ग्रंथ विक्रीला चांगला प्रतिसाद
एकीकडे वाचन संस्कृती लोप पावत असल्याचे बोलले जात आहे. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि लॅपटॉप दिसत आहे. अशाही स्थितीत जालना येथे दोन दिवस अस्मितादर्श साहित्यसंमेलनलनानिमित्त वेगवेगळ्या प्रकाशकांचे गं्रथ विक्रीची दालने उभारली होती. या दालनांमध्ये नागरिकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला.

Web Title: To be established at Aurangabad, a Patna Research Center should be established

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.