जालन्यातील सावरकर स्मारक परिसराचे सुशोभीकरण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:59 AM2018-05-29T00:59:22+5:302018-05-29T00:59:22+5:30
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करण्याची ग्वाही नगराध्यक्षा संगीता गोरट्याल यांनी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करण्याची ग्वाही नगराध्यक्षा संगीता गोरट्याल यांनी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
सावरकर चौकात आयोजित या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष राजेश राऊत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे,सिद्धीविनायक मुळे, भास्कर दानवे, विजय पवार, धनसिंग सूर्यवंशी, अशोक पांगारकर, संजय देठे, ज्ञानेश्वर ढोबळे, पारसनंद यादव, चंपालाल भगत, समितीचे अध्यक्ष श्रीपाद रत्नपारखी बंकटलाल खंडेलवाल आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांनी सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. सावरकरांच्या विचारांची देशाला गरज असल्याचे सिद्धीविनायक मुळे यांनी सांगितले.
उपनगराध्यक्ष राऊत यांनीही सावरकरांच्या पुतळासोबतच शहराचे सुशोभिकरणासाठी तत्पर असल्याचे सांगितले. रवींद्र देशपांडे यांनी सुशोभीकरणाची मागणी केली. समितीचे अध्यक्ष श्रीपाद रत्नपारखी यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे आभार मानले. यावेळी समितीचे उपाध्यक्ष प्रथमेश कुंटे, सचिव गणेश लोखंडे, कार्याध्यक्ष कृष्णा दंडे, कोषाध्यक्ष अॅड. सुबोध किनगावकर, सुरेश मुळे, अमित कुलकर्णी, सुमित कुलकर्णी, सौरभ पाठक, सतीश अकोलकर, विनोद कुलकर्णी, विनोद जोशी, संगीता देशपांडे, कल्याणी कुलकर्णी, दीपा बिन्नीवाले यांच्यासह उत्सव समितीच्या अन्य पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.