जालनेकरांनो खबरदारी घ्या, दरदिवसाला निघणारी रुग्णसंख्या हजाराजवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:27 AM2021-04-14T04:27:37+5:302021-04-14T04:27:37+5:30

जालना : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, दरदिवसाला निघणारी रुग्णसंख्या आता हजाराच्या आकड्याजवळ पोहोचली ...

Beware, Jalnekars, the number of patients leaving every day is close to a thousand | जालनेकरांनो खबरदारी घ्या, दरदिवसाला निघणारी रुग्णसंख्या हजाराजवळ

जालनेकरांनो खबरदारी घ्या, दरदिवसाला निघणारी रुग्णसंख्या हजाराजवळ

googlenewsNext

जालना : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, दरदिवसाला निघणारी रुग्णसंख्या आता हजाराच्या आकड्याजवळ पोहोचली आहे. जिल्ह्यात मंगळवारी विक्रमी ८६४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला, तर ५७२ जणांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सात जणांचा मंगळ‌वारी मृत्यू झाला.

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढतच आहे. जिल्ह्यात मंगळवारी तब्बल ८६४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाधितांमध्ये जालना शहरातील २३५, अंतरवाला १, बाजी उम्रद १, बापकळ १, बेथल १, भाटेपुरी ४, चंदनझिरा ५, दादावाडी ३, देवमूर्ती १, धानोरा २, धारकल्याण १, घोटण १, गोलापांगरी १, गोंदेगाव २, हिवरा १, हिवर्डी ३, इंदेवाडी १, जामवाडी ४, कचरेवाडी ६, कडवंची ३, काकडा १, कारला १, खरपुडी ४, खोडेपुरी १७, कोडा १, माळी पिंपळगाव १, मौजपुरी १, नागेवाडी १, नंदापूर १, नाव्हा १, नेर १, नि. पोखरी १, राममूर्ती ३, सेवली ५, टाकरवन २, वखारी १, वडगाव १, वरखेडा येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

मंठा शहरातील ५, अंबोडा १, दहीफळ ४, ढोकसाळ ५, माळतोंडी १, पाटोदा ३, पोखरी १, तळणी १, तर परतूर शहरातील ४१, आंबा ४, अंगलगाव ६, बाबुलतारा १, दहीफळ भोंगाने १, कंडारी १, काऱ्हाळा १०, खडकी १, खांडवी ११, ल. पिंपरी १, लिंगसा ४, रायपूर ३, सातोना १, श्रीष्टी २, सोईजना ३, वाढोना ५, वाळखेड १, वरफळ १, वाटूर फाटा ५, वाटूर तांडा ७, वाटूरगाव येथील ५ जणांना कोरोनाची बाधा झाली.

घनसावंगी शहरातील १७, अंतरवाली दाई २, भेंडाळा १, बोर रांजणी १, खालापुरी ३, कुंभार पिंपळगाव १, मंगू जळगाव १, मुरमा २, पानेवाडी १, पारडगाव १, राजेगाव १, रांजणी १, तीर्थपुरी येथील १७ जणांना कोरोनाची लागण झाली.

जाफराबाद शहरातील ५, अकोला देव १, आंबेगाव २, आसई १, विठोडी २१, भारज १, ब्रह्मपुरी २, डावरगाव २, खानापूर १, सावरगाव १, टेंभुर्णी १, वरूड २, तर भोकरदन शहरातील १७, आन्वा ३, बरंजळा १, चांदई इको २, चणेगाव १, धावडा १, हसनाबाद १, जळगाव सपकाळ येथील चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

अंबड शहरात ९८ रुग्ण

अंबड शहरातील ९८, अंतरवाला ९, आपेगाव १, बी. जळगाव ६, बक्षीवाडी ४, बनगाव १, भालगाव ३, भंबेरी २४, तर बदनापूर शहरातील ७, बावणे पांगरी १, भरडखेडा १, भिलपुरी ३, चणेगाव १, दाभाडी १, ढासला १, मानदेऊळगाव १, मसला १, सोमठाणा १, पिंपळगाव १, राळा २, शेलगाव १, तुपेवाडी ३, तडेगाव १, वाकुळणी येथील एकाला कोरोनाची बाधा झाली.

बाधितांची संख्या ३३ हजारांवर

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३३ हजार ९८२ झाली असून, त्यातील ५८३ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातील उपचारानंतर २६ हजार ९२३ जण कोरोनामुक्त झाले. वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांनी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.

Web Title: Beware, Jalnekars, the number of patients leaving every day is close to a thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.