बी.जी. पवार जालन्याचे नूतन जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 01:19 AM2018-05-03T01:19:05+5:302018-05-03T01:19:05+5:30
मीरा-भार्इंदर महानगर पालिकेचे आयुक्त बी.जी.पवार हे आता जालन्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून रूजू होणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मीरा-भार्इंदर महानगर पालिकेचे आयुक्त बी.जी.पवार हे आता जालन्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून रूजू होणार आहेत. त्यांच्या बदलीचे आदेश बुधवारी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाले आहेत.
बी.जी. पवार यांना २००६ मध्ये आयएसचा दर्जा मिळाला असून, त्यांनी यापूर्वी जालना जिल्ह्यात भोकदन येथे १९८६ ते १९८८ तहसीलदार म्हणून काम केले आहे. यापूर्वीचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांची बदली मुंबईचे जिल्हाधिकारी येथे झाल्या नंतर जवळपास १५ दिवसानंतर नवीन जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती होत आहे. पवार यांनी यापूर्वी जिल्ह्यात काम केल्याने त्यांना या जिल्ह्याचा अनुभव आहे. त्यातच मुख्यमंत्री शुक्रवारी जिल्हा दौ-यावर येत आहेत, तत्पूर्वी पवार हे रूजू होतील असे सूत्रांनी सांगितले.