कुशल कामगारांमुळेच भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:38 AM2021-04-30T04:38:18+5:302021-04-30T04:38:18+5:30

जालना : जालना येथील स्टील उद्योगाने कुशल कामगारांच्या परिश्रमावरच संपूर्ण देशपातळीवर दर्जेदार स्टीलचे उत्पादन करून मोठी भरारी घेतली आहे. ...

Bharari only because of skilled workers | कुशल कामगारांमुळेच भरारी

कुशल कामगारांमुळेच भरारी

Next

जालना : जालना येथील स्टील उद्योगाने कुशल कामगारांच्या परिश्रमावरच संपूर्ण देशपातळीवर दर्जेदार स्टीलचे उत्पादन करून मोठी भरारी घेतली आहे. भविष्यात अनेक नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी स्टील उद्योगातील कामगार नेहमीच तत्पर असतो. हे आपण गेल्या तीस वर्षांच्या अनुभवावरून लक्षात घेतले आहे.

स्टील उद्योग हा अवजड उद्योगामध्ये मोडणारा आहे. जालन्यात स्टीलची निर्मिती करताना जवळपास सर्वच उद्योजक हे खऱ्या अर्थाने टाकाऊपासून टिकाऊ स्टील बनवितात. यासाठी देश आणि परदेशातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. आज देशासमोर, स्क्रॅबची विल्हेवाट लावण्याचे मोठे आव्हान आहे. हे आव्हान खऱ्या अर्थाने जालन्यातील स्टील उद्योजक लीलया सांभाळत आहेत. या उद्योगातून पर्यावरणाचे रक्षण होते. हे कोणाच्याही लक्षात येत नाही आणि त्याबद्दल कोणी ठासून बोलतही नाही; परंतु आज आम्ही सर्व जण एकत्रित येऊन जालन्यात स्क्रॅब अर्थात मराठीत झाल्यास खऱ्या अर्थाने भंगार उच्च दाबाच्या भट्टीत प्रक्रिया करून वितळवून त्यापासून लोखंडी सळयांचे उत्पादन करतो. आज देश वेगळ्या विकासाच्या टप्प्यावर आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे जालन्याजवळून जाणारा समृद्धी महामार्ग. यासह जालन्यातच होऊ घातलेला ड्रायपोर्ट प्रकल्पदेखील पायाभूत सुविधाचाच एक भाग आहे.

जालना येथे नावारूपास आलेल्या स्टील उद्योगात काम करणाऱ्या कामगारांचा प्रगतीमध्ये सिंहाचा वाटा आहे. उच्च दाब भट्टीजवळ अहोरात्र काम करून हा कामगार नागरिकांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या स्टीलचे उत्पादन करतो.

कामगारांचे हे काम करणे म्हणजे खऱ्या अर्थाने एक प्रकारे आगीशी खेळणेच म्हणावे लागेल. आगीशी खेळत असताना भाजण्याची तयारी ठेवावीच लागते. त्यामुळे अपघात होऊ नये, यासाठी सर्वच जण सतर्क असतात; परंतु ॲक्सिडेंट हा शब्दच असा आहे की, दुर्घटनाही काही क्षणांच्या दुर्लक्षाने घडते; परंतु अशा या किरकोळ दुर्घटनांना न जुमानता जालन्यातील कामगारांनी आपल्या कुशलतेवर एक मोहर उमटवली आहे. त्यामुळे आम्ही कितीही गुंतवणूक आणि तंत्रज्ञान विकसित केले तरीदेखील हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात वापरून त्यापासून स्टीलची निर्मिती करण्याशिवाय पर्याय नाही. कुठलाही उद्योग असो, तेथे उपलब्ध असलेल्या कुशल मनुष्यबळ आणि त्याचे व्यवस्थापन, तसेच घाम गाळून परिश्रम करणाऱ्या कामगारांच्या हिताचे रक्षण जेथे केले जाते, तो उद्योग निश्चितच नावारूपास येऊन त्याच कंपनीचा झेंडा सतत उंचावत ठेवतात. कामगार दिनानिमित्त केवळ शुभेच्छा देऊन आम्ही थांबत नाही, तर जवळपास सर्वच स्टील उद्योजक कामगार आणि त्यांच्या कुटुंबाशी नेहमीच सर्व बाजूंनी पाठीशी उभे राहतो, हे नव्याने सांगण्याची गरज नाही.

-दिनेश राठी, व्यवस्थापकीय संचालक, आयकॉन

--

Lokmat Hello Jalna

Geeta Complex, Opps. Gadiya Hospital,

Bhokardan Naka, Jalna

Web Title: Bharari only because of skilled workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.