Bharat Bandh : इंधन दरवाढी विरोधात जालन्यात काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 04:32 PM2018-09-10T16:32:22+5:302018-09-10T16:33:16+5:30

शहर काँग्रेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 

Bharat Bandh: A rally on the District Collector's office in Jalna against the fuel price hike | Bharat Bandh : इंधन दरवाढी विरोधात जालन्यात काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 

Bharat Bandh : इंधन दरवाढी विरोधात जालन्यात काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 

Next

जालना : पेट्रोल, डिझेलचे वाढलेले दर तसेच केंद्रासह राज्यातील भाजप सरकारच्या निषेधार्थ आज सकाळी काँग्रेसच्यावतीने भारत बंद पुकारण्यात आला. या पार्श्वभूर्मीवर शहर काँग्रेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 

या मोर्चाला मामा चौक येथून सुरुवात झाली. त्यानंतर मस्तगड, गांधी चमन, शनि मंदीर, अबंड चौफुली मार्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी केंद्र व राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी माजी आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाध्यक्ष सुरेश जेथलिया, राजेंद्र राख, शेख महेमूद, विजय कामड, कल्याण दळे, लोखंडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

बंदला संमिश्र प्रतिसाद
काँग्रेसच्यावतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदला जालन्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. सोमवारी शहरातील बाजारपेठा सुरु होत्या. तर जिल्ह्यातील काही गावांमध्ये बंदला उर्त्स्फुत प्रतिसाद मिळाला.

Web Title: Bharat Bandh: A rally on the District Collector's office in Jalna against the fuel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.