भरदिवसा घरफोडी; लाखोंचा मुद्देमाल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:14 AM2019-06-12T00:14:58+5:302019-06-12T00:15:26+5:30
जालना शहरातील करवानगर येथील एका घरात चोरट्यांनी मंगळवारी भरदिवसा डल्ला मारला. चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असून, याप्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
जालना : जालना शहरातील करवानगर येथील एका घरात चोरट्यांनी मंगळवारी भरदिवसा डल्ला मारला. चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असून, याप्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
करवानगर येथील अनिख शहा हे कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास खिडकी तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरात असलेल्या कपाटातील सोन्या - चांदीची दागिने व रोख रक्कम लंपास केली. या घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, अनिख शेख यांचे कुटुंब बाहेरगावी असल्याने अद्यापही सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कररण्यात आला नाही.
नुतन वसाहत येथे एका महिलेस लुटले
जालना : जालना शहरातील नुतन वसाहत येथे एका महिलेस मारहाण करुन लुटल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी संतोष किसन औसारे (४१, रा. नुतन वसाहत) यांच्या फिर्यादीवरुन सय्यद बब्बु (रा. नुतन वसाहत) याच्याविरुध्द कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी व आरोपी हे एकाच गल्लीत राहतात. संतोष औसारे हे कुटुंबासह नुतन वसाहत येथे जात असतांना आरोपीने दारु पिण्यासाठी पैसे मागितले. त्यावर संतोष औसारे यांनी नकार दिला असता, आरोपीने संतोष औसारे व त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करुन मारहाण केली.