ओबीसी नेते हाके, वाघमारे यांची मोठी घोषणा; राज्यभर काढणार अभिवादन दौरा

By शिवाजी कदम | Published: June 25, 2024 08:07 PM2024-06-25T20:07:31+5:302024-06-25T20:08:29+5:30

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करून दौऱ्यास प्रारंभ करणार

Big announcement by OBC leader Laxman Hake, Navnath Waghmare; A greeting tour will be held across the state | ओबीसी नेते हाके, वाघमारे यांची मोठी घोषणा; राज्यभर काढणार अभिवादन दौरा

ओबीसी नेते हाके, वाघमारे यांची मोठी घोषणा; राज्यभर काढणार अभिवादन दौरा

जालना: ओबीसींच्या मागण्यासाठी वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी उपोषण केले. सरकारने मागण्या मान्य करण्याचे आश्वासनानंतर आठ दिवसांनी उपोषण स्थगित करण्यात आले होते. यानंतर लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे हे बुधवारपासून राज्यातील विविध भागात तीन दिवसीय अभिवादन दौरा काढणार आहेत.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे हे बुधवारपासून तीन दिवसाचा अभिवादन दौरा करणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करून दौऱ्यास प्रारंभ करणार आहेत. यानंतर बंजारा समाजाचे आराध्य दैवत असणाऱ्या पोहरादेवी मंदिर तसेच दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे स्मृतिस्थळ असलेल्या गोपीनाथ गड आणि भगवानगडासह चौंडी येथे देखील ते भेट देणार आहेत. दरम्यान ओबीसी भटक्या विमुक्तांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी हा तीन दिवसाचा दौरा असल्याच लक्ष्मण हाके यांनी मंगळवारी सांगितले.

Web Title: Big announcement by OBC leader Laxman Hake, Navnath Waghmare; A greeting tour will be held across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.