तरुण अधिकाऱ्यांकडून जिल्ह्याच्या मोठ्या अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:21 AM2021-07-18T04:21:59+5:302021-07-18T04:21:59+5:30
दुसरीकडे जालन्याच्या जिल्हाधिकारी पदी आता खऱ्या अर्थाने डॉक्टर असलेले आणि नंतर यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस झालेले डॉ. विजय राठोड ...
दुसरीकडे जालन्याच्या जिल्हाधिकारी पदी आता खऱ्या अर्थाने डॉक्टर असलेले आणि नंतर यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस झालेले डॉ. विजय राठोड हे रुजू झाले आहेत. तेदेखील तरुण आहेत. त्यामुळे दोन प्रमुख पदांवर थेट आयएएस आणि तेही तरुण अधिकारी असल्याने त्यांच्याकडून जिल्ह्यातील जनतेस मोठ्या आशा आहेत. त्यांना पालकमंत्री म्हणून लाभलेले राज्याचे आरोग्यमंत्री हेदेखील तरुणच आहेत. त्यामुळे या तीन तरुण प्रमुखांकडून जिल्ह्याच्या लांबलेल्या विकासाला आणखी गती देऊ शकतात, यात शंका घेण्याचे कारण नाही. ते कसे काम करतात हे आगामी काही महिन्यांत जनतेला कळणारच आहे.
सासरे-जावई योगायोग
जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे सासरे हे जालना जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या हातात जिल्ह्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत. असे म्हटल्यास वावगे ठरू नये.