रुग्णालय परिसरातून दुचाकी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:33 AM2021-09-21T04:33:04+5:302021-09-21T04:33:04+5:30
विरेगव्हाण येथे बस-ट्रकचालकांचा सत्कार अंबड : जय संघर्ष वाहनचालक सामाजिक संस्थेच्या वतीने अंबड येथे प्रवासादरम्यान आलेल्या बस व ...
विरेगव्हाण येथे बस-ट्रकचालकांचा सत्कार
अंबड : जय संघर्ष वाहनचालक सामाजिक संस्थेच्या वतीने अंबड येथे प्रवासादरम्यान आलेल्या बस व ट्रकचालकांचा चालक दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी चालकांनी निर्व्यसनी, आपल्या शरीराची काळजी, कुटुंबाची काळजी आणि प्रवासादरम्यान प्रवासी वाहतूक व प्रवाशांची काळजी घेण्याची शपथ घेतली. यावेळी मराठवाडा अध्यक्ष दत्ता जामकर, जिल्हा संपर्कप्रमुख विष्णू येडे, संभाजी वराडे आदींची उपस्थिती होती.
मिशन कवच कुंडलबाबत जागृती
जाफराबाद : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जाफराबाद तालुक्यात ठिकठिकाणी मिशन कवच कुंडल मोहिमेंतर्गत शहरातील किल्ला भागातील जिल्हा परिषद उर्दू हायस्कूल येथे कोविड लसीकरण शिबिर घेण्यात आले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला कुटुंबापर्यंत पोहोचू न देण्यासाठी लस अत्यंत आवश्यक असल्याचे तहसीलचे जी. एस. सपकाळ यांनी सांगितले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी पी. एस. सोनटक्के, वैद्यकीय अधिकारी अजय बोर्डे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शेख शबाना, आरोग्यसेवक पी. जे. जेऊघाले, एस. एस. भानुसे, वंदना हिवाळे, मीरा जाधव, फौजिया सय्यद, शारदा ससाणे, रुक्साना नूर मोहंमद, संगीता इंगळे, भारती कोलते आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
जालना : दीड वर्षापासून वाघोडा तांडा अंधारात असून, महावितरणकडे तक्रारी केल्यानंतरही तांड्यात वीज उपलब्ध होत नसल्याने गोर सेनेच्या वतीने शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या मागणीचे निवेदन तहसीलदार, महावितरणच्या शाखा अभियंत्यांना देण्यात आले आहे. उपोषणात रवी राठोड, संदीप जाधव, रवी पवार, नारायण पवार, अरुण राठोड, अमोल राठोड, पवन पवार, सचिन पवार, शरद पवार, प्रदीप पवार, सावन पवार, राहुल राठोड, समाधान पवार, प्रवीण राठोड, राजेश राठोड, वैभव पवार, बाळू पवार, राजू पवार आदी सहभागी झाले आहेत.
जे. ई. एस.मध्ये विजेत्यांना बक्षिसे
जालना : येथील जेईएस महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेत्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवनारायण बजाज यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात वर्षा घुसिंगे, सोनाली चुंगडे, राहुल लोखंडे, वैष्णवी वाघमारे, आदित्य कुलकर्णी, जयंत कल्याणकर, पूनम शिंदे, वरद भांगडिया, साचल बिहानी, आदित्य चांडलिया यांचा समावेश आहे. यावेळी डॉ. नानासाहेब गोरे, डॉ. फुलचंद मोहिते, प्रा. शिवाजी वानरे, डॉ. राजेंद्र सोनवणे, डॉ. हेमंत वर्मा, डॉ. मनीषा सुतार, प्रा. कविता बागडी, प्रा. भाग्यश्री बियाणी आदी उपस्थित होते.
वसंतनगर येथे लसीकरण मोहीम
अंबड : वसंतनगर येथे अष्टविनायक गणेश मंडळाच्या वतीने पुढाकार घेऊन आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गुरुवारी गावात ग्रामस्थांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. याप्रसंगी आरोग्य अधिकारी तोडकर, डॉ. माने, आरोग्यसेविका कसबे, मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, दगडू जाधव, आसाराम जाधव, विजय जाधव, सुनील जाधव, रवि जाधव, दगडू जाधव आदींची उपस्थिती होती.