भाजपचा अजेंडा; खोटी नियत और झूठा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:54 AM2018-05-28T00:54:49+5:302018-05-28T00:54:49+5:30
या सरकाराचा अजेंडा म्हणजे खोटी नियत और झुठा विकास आहे, असा आरोप आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे (एपीआय) संस्थापक अध्यक्ष विजय मानकर यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भाजप सरकारला चार वर्ष पूर्ण झाली आहे. परंतु सरकारने चार वर्ष फक्त घोषणाबाजी केली. त्यांनी ना शेतकऱ्यांकडे लक्ष दिले ना रोजगाराकडे त्यामुळे देशातील तरूण मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे. या सरकाराचा अजेंडा म्हणजे खोटी नियत और झुठा विकास आहे, असा आरोप आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे (एपीआय) संस्थापक अध्यक्ष विजय मानकर यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केला. केला.
मानकर म्हणाले की, आमचा पक्ष आंबेडकरांच्या विचारांने चालणार आहे. पक्षाच्या माध्यमातून देशभरात आंबेडकरांचे मूल्य, त्यांच्या विचारांचा प्रसार करणार आहे. तसेच शेतकरी, कामगार व माध्यमवर्गीय लोकासाठीही आम्ही लढा देणार आहे. सरकारने ना शेतक-यांची कर्जमाफी केली ना स्वामिनाथन आयोग लागू केला. देशातील लाखो तरूण नोकरी वि़ना आहे.
सरकारला याचे काहीच देणे घेणे नाही. ते फक्त खोट दावे करतात. तसेच यावर्षी भीमा कोरेगाव दंगलीत गृहखात्याने निष्काळजीपणा केला आहे. त्यामुळे गृहखात्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाचे कार्य तळागाळापर्यंत वाढविणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
या पत्रकार परिषदेत प्रकाश शिंदे, जिल्हाध्यक्ष , एस. आर. साबळे, सचिव एन. डी. खंदारे, तालुका सचिव कैलास वाघ, तालुकाध्यक्ष संजय वेव्हाल, कोषाध्यक्ष अनिल नावकर, जिल्हा सचिव विठ्ठल शेळके, डी. एच. म्हस्के यांच्यासह कार्यकत्यांची उपस्थिती होती. .