लोकसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज-रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:38 AM2018-11-11T00:38:04+5:302018-11-11T00:38:22+5:30

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदार संघात भाजपाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली असून, ही निवडणुक पक्ष विकासाच्या मुद्यावर लढविणार असल्याचे सांगून अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा देखील भाजपाच्या समोर असल्याचे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष खा़रावसाहेब दानवे यांनी भोकरदन येथील निवास्थानी पत्रकाराशी बोलताना सांगितले़

BJP ready for Lok Sabha elections- Raosaheb Danwe | लोकसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज-रावसाहेब दानवे

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज-रावसाहेब दानवे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदार संघात भाजपाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली असून, ही निवडणुक पक्ष विकासाच्या मुद्यावर लढविणार असल्याचे सांगून अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा देखील भाजपाच्या समोर असल्याचे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष खा़रावसाहेब दानवे यांनी भोकरदन येथील निवास्थानी पत्रकाराशी बोलताना सांगितले़
दिपावली स्रेहमिलनाच्या कार्यक्रमानंतर खा़ दानवे यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले की पंतप्रधान नरेद्र मोदी व अमीत शहा यांच्या नेत्तृत्वाखाली लोकसभेच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढविण्यात येणार आहेत, मोदी यांना दुस-यांदा पंतप्रधान करण्यासाठी राज्यातून जास्तीत जास्त खासदार निवडूण जाण्यासाठी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने केलेल्या चांगल्या कामाचा मुद्दा निवडणुकीत समोर ठेऊन पक्ष संघटन कामाला लागले आहे. गेल्या निवडणुकीमध्ये भाजप, सेनेची युती होती मात्र त्यानंतर विधानसभेच्यावेळी युती तुटली होती या वेळी निवडणुक युतीने लढवावी ही भाजपाची इच्छा आहे, मात्र मित्रपक्षाची आद्याप भूमीका स्पष्ट नाही. त्यामुळे आम्ही राज्यातील सर्व ४८ मतदार संघामध्ये तयारी केली आहे. युती झाली तर आम्ही केलेली तयारी त्यांच्यासाठी उपयोगी पडेल जर नाही झाली तर मात्र आम्हांला लढण्याची तयारी करणे आवश्यक आहे, असे दानवे यांनी सांगून आपण गेल्या आठवड्यामध्ये गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती या मतदार संघाचा दौरा केला असून, सध्या जळगाव, धुळे, नंदूरबार, दिंडोरी, रावेर, नाशिक, पालघर, ठाणे या लोकसभा मतदार संघात आपला पक्ष संघटनाच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दौरा सुरू असल्याचे दानवे यांनी सांगितले़ संध्या दुष्काळी परिस्थीती असल्यामुळे सरकार हे शेतक-याच्या पाठीमागे खंभीरपणे उभे असुन वेळ प्रंसगी सरकारची तिजोरी रिकामी करावी लागली तरी सरकार मागे हटणार नाही असे दानवे यांनी सांगुन या निवडणुकीत भाजप विकास कामावर निवडणुक जिंंकेल मात्र त्याच बरोबर पक्षाने राम मंदिराचा प्रश्न सुध्दा सोडला नसल्याचे ते म्हणाले.
समोरून कोण उमेदवार येईल यांची चिंंता नाही़
पत्रकारानी आपण राज्याच्या दौ-यावर असतात मग जालना लोकसभा मतदार संघाकडे कसे लक्ष देणार अशी विचारणा केली असता, दानवे म्हणाले की आपण जमीनीवर पाय ठेऊन चालणारे कार्यकर्ता आहोत. त्यामुळे आपण कोठेही असलो तरी लक्ष मात्र जालना लोकसभा मतदार संघावरच असते. या मतदार संघात ६ हजार कोटीच्या रस्त्याची कामे सुरू आहेत, अनेक महत्वाचे प्रकल्प मंजुर झाले आहेत, शिवाय आपण मतदारांच्या कायम संपर्कात असतो त्यामुळे समोरून कोण उमेदवार येईल यांची आपल्याचा चिंंता नाही, या मतदार संघातील ८० टक्के निवडणुकीचे काम पूर्णत्वाकडे आल्याचे दानवे यांनी सांगितले़

Web Title: BJP ready for Lok Sabha elections- Raosaheb Danwe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.