शिवसेनेसोबत युतीची टाळी देण्यास भाजपचा हात पुढेच : रावसाहेब दानवे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 03:20 PM2019-01-28T15:20:02+5:302019-01-28T15:34:25+5:30

शिवसेनेकडून त्याबद्दल सकारत्मक निर्णय कधी होतो, याकडे लक्ष आहे

The BJP's always forward his hand over the alliance with Shiv Sena: Raosaheb Danwe | शिवसेनेसोबत युतीची टाळी देण्यास भाजपचा हात पुढेच : रावसाहेब दानवे

शिवसेनेसोबत युतीची टाळी देण्यास भाजपचा हात पुढेच : रावसाहेब दानवे

Next

जालना : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत शिवसेनेसोबत युती करण्यासाठी आमचा हात पुढेच आहे. आता शिवसेनेकडून त्याबद्दल सकारत्मक निर्णय कधी होतो. याकडे लक्ष लागून असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी दिली.

ते सोमवारी भाजप कार्यकारणीचे पहिले सत्र संपल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. याबैठकीमध्ये मराठवाड्याच्या विकासासह दुष्काळाच्या मुद्यावर आढावा घेण्यात येणार असून, मराठवाड्यातील मंत्री व त्यांच्या मागण्या आणि नियोजन मांडणार आहेत. 

पुढे बोलतांना खा. दानवे म्हणाले की, काद्याचे भाव पडल्यानंतर भाजपाने सवार्धिक अनुदान दिले. किंमतीचे हे गणित मागणी आणि पुरवठ्यावर अंवलबून असते, असेही ते म्हणाले. 

युती संदर्भात अंतिम चर्चा झाली नाही 
शिवसेनाला जास्त जागा देण्यास संदर्भात निर्णय झाला आहे काय ?, असे त्यांना विचारले असता, स्पष्ट नकार देत युती संदर्भात अंतिम चर्चा झाली नसल्याचे त्यांनी संगितले. युतीचा निर्णय कधी होणार असे विचारले असता, उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरही युतीचा निर्णय होऊ शकतो. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मुंबई येथील कार्यक्रमातील भाषण प्रसार माध्यमांनी तोडून मोडून प्रकाशित केले असल्याचे ते म्हणाले.

Web Title: The BJP's always forward his hand over the alliance with Shiv Sena: Raosaheb Danwe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.