रक्तदान शिबिरात १०९ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:30 AM2021-05-13T04:30:40+5:302021-05-13T04:30:40+5:30
जालना : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या वतीने बुधवारी रक्तदान शिबिराचे आयोजन ...
जालना : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या वतीने बुधवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, १०९ जणांनी रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळपासून नागरिकांनी लसीकरणासाठी गर्दी केली होती. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे पालन करण्यात आले. शिबिरात १०९ जणांनी रक्तदान केले. जालना येथील जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने रक्ताचे संकलन करण्यात आले. यासाठी डॉ. शिवराम जाधव, राजकुमार झवर, सचिन त्रिवेदी, रेखा न्याहाळकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस निरीक्षक देविदास शेळके, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, आदींची उपस्थिती होती.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक रमेश रूपेकर, गणेश झलवार, नागनाथ भताने, परशुराम पवार, कडुबा सोनोने, समाधान तेल्रंगे, फुलचंद गव्हाणे, योगेश पठाडे, वैभव खोकले, सुधीर वाघमारे, आदींनी परिश्रम घेतले.