परतूर येथे शिबिरात १३४ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:40 AM2020-12-30T04:40:59+5:302020-12-30T04:40:59+5:30
परतूर : परतूर येथे बालग परिवाराच्या वतीने सोमवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला ...
परतूर : परतूर येथे बालग परिवाराच्या वतीने सोमवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून, १३४ जणांनी रक्तदान केले आहे.
या शिबिराचा शुभारंभ अंकुशराव बागल, अॅड माणिक काळे, शंकर पवार यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी आ. राजेश राठोड, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, सभापती कपिल आकात, माजी आ. हरीभाऊ खांडविकर, बाबासाहेब तेलगड, संदीप बाहेकर, राहूल लोणीकर, विजय राखे, इंद्रजित घनवट, विनायक काळे, रहीमोद्दीन कुरेशी, अखिल काजी, प्रकाश घुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यात कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा भासत आहे. राज्य शासनाने रक्तदान करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्या अनुषंगाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी रक्तदात्यांचा सत्कार करून प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमास अॅड. विशाल बागल. अॅड. जगन बागल, रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी शिवराज जाधव, गणेश पवार, नगरसेवक कृष्णा आरगडे, बाबुराव हिवाळे आदी उपस्थित होते.
फोटो
परतूर येथे आयोजित रक्तदान शिबिराचा शुभारंभ करतांना अॅड. माणिक काळे, शंकर पवार, अंकूश बागल, विजय राखे, अॅड. विशाल बागल आदी.