बोगस शिक्षक भरतीचे रॅकेट; गांभीर्याने सखोल तपास व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 12:47 AM2019-11-26T00:47:55+5:302019-11-26T00:48:29+5:30
वेगवेगळ्या संस्थेत शिक्षकाची नोकरी लावून देण्यासाठी लाखो रूपयांची मागणी करणाऱ्या संशयित आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वेगवेगळ्या संस्थेत शिक्षकाचीनोकरी लावून देण्यासाठी लाखो रूपयांची मागणी करणाऱ्या संशयित आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे असतांना ज्या गंभीरतेने पोलिसांकडून या रॅकेटचा पर्दाफाश होणे अपेक्षित होते, तसे न झाल्याने आरोपींची हिंमत वाढली आहे. हा तपास उच्च पदावरील अधिकाऱ्यांकडे दिल्यास त्यातून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे निवेदन फसवणूक झालेल्या गणेश रामकिसन वाघ यांनी सोमवारी पोलीस अधीक्षकांना दिले आहे.
या निवेदनात वाघ यांनी म्हटले आहे की, औरंंगाबाद जिल्ह्यातील विविध संस्थांमध्ये शिक्षकाचीनोकरी लावून देतो म्हणून संशयित आरोपी महेश उर्फ गणेश सुनील पालवे यांच्या विरूध्द जालना येथील सदरबाजार पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती. या गंभीर प्रकरणाचा तपास हा एका जमादाराकडे सोपविण्यात आला. संबंधित प्रकरणात पालवेला अटकही करण्यात आली, परंतु नंतर त्याचा जामीन होऊन सध्या बिनधास्तपणे वावरत आहे. त्याने व त्याच्या अन्य पाच ते सहा सहकाºयांनी मिळून डीएड आणि बीएड झालेल्या सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून लोखो रूपये उखळले आहेत.
हे लाखो रूपये घेऊनही गणेश वाघ यांना बनावट रूजू आदेश देण्यासह जिल्हा परिषदेतून अॅपू्रव्हल मिळून देण्याचे प्रकारही पुढे आले आहे.
माझ्या सारखे जवळपास शंभरपेक्षा अधिक शिक्षक हे पालवे यांच्या आमिषाला बळी पडले असावेत, हा सर्व व्यवहार कोट्यवधी रूपयांचा असून, यात शिक्षण संचालक तसेच विभागीय आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून पालवेच्या मुसक्या आवळल्यास मोठे फसवणुकीचे रॅकेट पुढे येऊ शकते.
१८ लाख रुपये घेऊन दिली बोगस आॅर्डर
आज मी पालवेविरूध्द रीतसर तक्रार दिली, मात्र अन्य फसवणूकग्रस्त देण्यास धजावत नाहीत. माझ्याकडून रोख १८ लाख रूपये शिक्षकांची नोकरी देण्यासाठी घेतले होते. आणि मला दिलेली आॅर्डर देखील बनावट असल्याचे चौकशी केल्यावर दिसून आले. मी वाळूज येथील जिजामाता बालक मंदिरमध्ये दोन ते तीन वर्षे नोकरी केली.
वेतनपत्रक तसेच हजेरी रजिस्टरही दर तीन महिन्यांना बदलले जात होते, हे माझ्या लक्षात आल्यावर आपण उर्वरित दोन लाख रूपये पालवेला दिले नसल्याचे वाघ यांनी निवेदनात नमूद केले आहे.