हातांच्या बोटावरून होणार आता ब्रेनमॅपिंग- कॅण्डी दुबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:44 AM2019-05-19T00:44:25+5:302019-05-19T00:45:06+5:30

मुलांचा बौद्धिक कल ओळखून त्यांना त्यानुसार शिक्षण देण्यासाठीची नवीन प्रणाली जालन्यातील कोठारी इंटरनॅशनल स्कूलने विकसित केली आहे.

Brainmapping from fingure prints- Kandy Dubey | हातांच्या बोटावरून होणार आता ब्रेनमॅपिंग- कॅण्डी दुबे

हातांच्या बोटावरून होणार आता ब्रेनमॅपिंग- कॅण्डी दुबे

Next

संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुलांचा बौद्धिक कल ओळखून त्यांना त्यानुसार शिक्षण देण्यासाठीची नवीन प्रणाली जालन्यातील कोठारी इंटरनॅशनल स्कूलने विकसित केली आहे. लहान वयात मुलांचा कल ओळखण्यासाठी डीएमआयटी ही अद्ययावत प्रणाली विकसित झाली असून, यामध्ये विद्यार्थ्यांच्या हाताच्या बोटांचे ठसे स्कॅन करून ते बंगळुरु येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. तेथून आलेल्या रिपोर्टनंतर त्या मुलाचा कल कुठल्या क्षेत्रात आहे हे लक्षात येते..
ब्रेन मॅपिंग का गरजेचे आहे ?
प्रत्येक मुलामध्ये कुठला ना कुठला गुण आणि कौशल्य असतेच. आपल्याकडे मराठीमध्ये व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती अशी म्हण आहे. त्यानुसार लहान वयातच मुलांचा कल कोणत्या क्षेत्रात आहे हे न्यूरो सायन्स तंत्रज्ञानानुसार जाणून घेणे आता शक्य झाले आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये अनुवंशिकता ठासून भरलेली असते. त्या अनुवंशिकतेनुसारच तो मुलगा काय करू शकतो, हे लगेचच ब्रेन मॅपिंगने लक्षात येते
हुशारी आणि या टेस्टचे फायदे
कोणते ?
कुठल्याही विद्यार्थ्यामध्ये परंपरागत शिक्षण देण्याची भारतात फार पूर्वीपासून पद्धत रूढ झाली आहे. परंतु, आजघडीला चीनमध्ये सहा वर्षे वयाचे मूल अथवा मुलगी यांना एका खोलीमध्ये वेगवेगळे खेळाचे साहित्य तसेच संगीत विषयक वाद्य ठेवली जातात. अनेक पुस्तकेही तेथे असतात. त्यावरून तो मुलगा, मुलगी कशात रमते यावरून त्याचा कल ओळखला जातो आणि नंतर त्यांना प्रवेश देऊन त्याचे शिक्षण दिले जाते.
डीएमआयटी का गरजेचे ?
डीमॉर्ट ग्लाफिक्स या नवीन तंत्रज्ञानानुसार परदेशामध्ये मुलांच्या बौद्धिकतेचा कल जाणून घेण्याची प्रणाली यापूर्वीच विकसित झालेली आहे. ही प्रणाली भारतात प्रथमत: आणण्यासाठी कोठारी इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक संचालक विनयकुमार कोठारी यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे भारतात डीएमआयटीनुसार विद्यार्थ्यांची कल चाचणी ही जालन्यात भारतात प्रथमच आणली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार शिक्षण
प्रत्येक विद्यार्थी हा गणित, भाषा विषय, संगीत क्षेत्रात निष्णात नसतो परंतु, तो यापैकी कुठल्या तरी विषयामध्ये त्याला आवड असते. त्यामुळे वर्गातील विद्यार्थ्यांच्या आवडी निवडीनुसार शिक्षण दिले जाते. एखादा गणिताचा प्रश्न त्या विद्यार्थ्याला त्यात आवड असल्यास तो चटकन सोडवतो. तर एखादा विद्यार्थी त्याला कविता लिहिता येते किंवा संगीत विषयात आवड असल्यास त्यासंबंधीचे प्रश्न तात्काळ सोडवितो. यावरून त्या मुलाची बौद्धिक क्षमता कुठल्या क्षेत्रात विकसित होऊ शकते, यावरून त्याला त्या त्या क्षेत्रात जाण्याचा सल्ला आम्ही पालकांना देतो.

Web Title: Brainmapping from fingure prints- Kandy Dubey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.