महत्वाच्या बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:31 AM2021-07-27T04:31:43+5:302021-07-27T04:31:43+5:30

जालना : शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी जालन्यात वर्षभरापूर्वी स्वयंचलित सिग्नल व्यवस्था बसविण्यात आली होती. ही व्यवस्था मामा चौक, शनिमंदिर चौक, ...

Breaking News | महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

Next

जालना : शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी जालन्यात वर्षभरापूर्वी स्वयंचलित सिग्नल व्यवस्था बसविण्यात आली होती. ही व्यवस्था मामा चौक, शनिमंदिर चौक, मुथा बिल्डिंग यासह अन्य चौकामध्ये बसविली होती; परंतु याकडे शहर वाहतूक शाखेसह पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. विशेष म्हणजे शनिमंदिरसह पाणीवेस भागात वाहतूक कोंडी सर्वांची डोकेदुखी ठरत आहे. या दोन्ही भागात एकेरी वाहतूक व्यवस्थेची गरज व्यक्त होत आहे.

--------------------------------------------------

पीकविमा संदर्भात लोणीकरांचा आरोप

जालना : पीकविमा संदर्भात खासगी विमा कंपन्या या शेतकऱ्यांची लूट करत आहेत. ही लूट थांबविण्यासाठी सरकारनेच विमा कंपनी स्थापन करावी अशी मागणी आ. बबनराव लोणीकर यांनी केली आहे. गेल्यावर्षी रिलायन्स कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपये विमा हप्ता म्हणून भरून घेतला होता. त्या तुलनेत केवळ साडेतीन कोटी रुपयांचीच मदत दिली आहे. शेतकऱ्यांनी विमा हप्ता म्हणून जवळपास ३१८ कोटी रुपये भरले असल्याची माहिती लोणीकर यांनी दिली. ही एक प्रकारे विमा कंपन्यांची पठाणी वसुली असल्याचेही लोणीकरांनी नमूद केले आहे.

----------------------------------------------

शहरातील तीनही बंधारे ओसंडले

जालना : गेल्या आठवड्यात दमदार पावसाने जालनेकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटवली आहे. जालना शहरातील कुंडलिका नदीवर रामतीर्थ स्मशानभूमीजवळ तसेच निधोना आणि अन्य एका ठिकाणी हे बंधारे २०१२ च्या दुष्काळात बांधले होते. ते बंधारे या पावसामुळे ओसंडून वाहत असून, यामुळे शहरातील संभाजीनगर तसेच बसस्थानक परिसरासह अन्य भागातील पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. कुंडलिका नदीला पूर आल्याने हे बंधारे भरल्याची माहिती देण्यात आली आहे.

-------------------------------------------

अंबड चौफुलीवर अपघातांचे सत्र

जालना : शहरातील अत्यंत वर्दळीचे ठिकाण म्हणून अंबड चौफुली ओळखली जाते. या चौफुलीवर गेल्या सहा महिन्यात जवळपास २३ जणांचे बळी गेले असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्ता चकचकीत झाल्याने वाहने वेगात येत आहेत. ही वाहने कुठून कुठे जाणार याचा अंदाज वाहनचालकांना येत नसल्याने हे अपघात वाढले आहेत. हे अपघात टाळण्यासाठी तातडीने या चौफुलीवर गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. परंतु त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने अपघातांचे सत्र दररोज सुरूच आहे.

Web Title: Breaking News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.