कार्यालयातील निवृत्त चौकीदाराकडून घेतली ११ हजारांची लाच, लाच लुचपतने रंगेहाथ पकडले

By दिपक ढोले  | Published: August 8, 2023 09:13 PM2023-08-08T21:13:52+5:302023-08-08T21:13:59+5:30

जालना : निवृत्तीनंतरचे लाभ देण्यासाठी पाटबंधारे विभागातील दोघांना सेवानिवृत्त चौकीदाराकडून ११ हजार रूपयांची घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ...

bribe of 11,000 taken from retired watchman, accused caught red-handed | कार्यालयातील निवृत्त चौकीदाराकडून घेतली ११ हजारांची लाच, लाच लुचपतने रंगेहाथ पकडले

कार्यालयातील निवृत्त चौकीदाराकडून घेतली ११ हजारांची लाच, लाच लुचपतने रंगेहाथ पकडले

googlenewsNext

जालना : निवृत्तीनंतरचे लाभ देण्यासाठी पाटबंधारे विभागातील दोघांना सेवानिवृत्त चौकीदाराकडून ११ हजार रूपयांची घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी पकडले. बाळाप्रसाद रनेर व हरी सोळंकी अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. तक्रारदार हे जालना येथील पाटबंधारे विभागात चौकीदार म्हणून सेवानिवृत्त झाले.

त्यांना निवृृत्तीनंतरचे लाभ देण्यासाठी वरिष्ठ लिपिक सोळंकी याने २० हजार रूपयांची लाचेची मागणी केली. त्यातील दहा हजार रूपये स्वीकारले. नंतर राहिलेले दहा हजारांची मागणी संशयित करीत होते. याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली. एसीबीने मंगळवारी सापळा लावून रनेर याला चार हजार तर सोळंकी यास सात हजार रूपयांची लाच स्वीकारतांना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक किरण बिडवे, पोनि. सुजित बडे, ज्ञानेदव जुंबड, शिवाजी जमधडे, गजानन घायवट, कृष्णा देठे, गणेश बुजाडे, गजानन खरात, संदीपान लहाने, गणेश चेके, आत्माराम डोईपोड यांनी केली आहे.

Web Title: bribe of 11,000 taken from retired watchman, accused caught red-handed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.