राजेवाडी येथे घरफोडी; सव्वाचार लाखांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 00:10 IST2020-02-27T00:10:07+5:302020-02-27T00:10:31+5:30
राजेवाडी शिवारातील घरातून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख असा एकूण चार लाख ३८ हजाराचा ऐवज चोरून नेला आहे

राजेवाडी येथे घरफोडी; सव्वाचार लाखांची चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : तालुक्यातील राजेवाडी शिवारातील घरातून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख असा एकूण चार लाख ३८ हजाराचा ऐवज चोरून नेला आहे
तालुक्यातील राजेवाडी शिवारातील गट क्र ८६४ मध्ये मंगळवारी रात्री साडे बारा ते पहाटे अडीच वाजेच्या दरम्यान अज्ञात आरोपींनी फिर्यादीच्या भावाच्या घरात प्रवेश करून घरातील लोखंडी संदूकात ठेवलेले १४२ ग्राम वजनाचे आणि चार लाख २६ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख बारा हजार रूपये असा एकूण चार लाख ३८ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सदर प्रकरणी रंजित अमरसिंग गुसिंगे (रा. राजेवाडी ता. बदनापूर) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.