चोरीचे दागिने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 01:12 AM2019-12-13T01:12:56+5:302019-12-13T01:13:22+5:30

मंठा पोलिसांनी गुरूवारी दुपारी दोघांना ताब्यात घेऊन त्याच्याकडील चोरीचे दागिने जप्त केले.

Burglary throughout the day at Kendhal Lake | चोरीचे दागिने जप्त

चोरीचे दागिने जप्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मंठा तालुक्यातील केंधळी पोखरी येथे बुधवारी दुपारी चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा दीड लाखाचा ऐवज लंपास केला होता. मंठा पोलिसांनी गुरूवारी दुपारी दोघांना ताब्यात घेऊन त्याच्याकडील चोरीचे दागिने जप्त केले.
मंठा तालुक्यातील केंधळी पोखरी येथील सदाशिव माखनराव केंधळे हे बुधवारी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. तर त्यांची आई जळण आणण्यासाठी बाहेर गेली होती. घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घराच्या पाठीमागील भिंतीवरून आतमध्ये प्रवेश केला. घरातील कपाटाचे दार तोडून आतील एक लाख रूपये किंमतीचे दागिने, रोख ४५ हजार रूपये असा एकूण १ लाख ४५ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. घटनेची माहिती रात्री उशिरा मंठा पोलीस ठाण्यात देण्यात आली.
या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच श्वान पथक, फ्रिंगर प्रिंट पथकाला बोलाविण्यात आले. श्वासनाने घटनास्थळापासून एका संशयिताच्या घरापर्यंत माग काढला. पोलिसांनी संशयित म्हणून भागवत भिकाजी लिमकर, विष्णू काशीनाथ घेंबड (दोघे रा. केंधळी पोखरी) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करीत त्यांच्याकडून चोरीस गेलेले दागिने जप्त केले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानदेव बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि विलास निकम, पोउपनि नितीन गट्टूवार, पोकॉ कातकडे, पोकॉ गायके आदींनी केली. यात श्वान पथक व ठसेतज्ज्ञांची मदत झाली.

Web Title: Burglary throughout the day at Kendhal Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.